हिवरे बाजार येथे जमिनीचे वादातून युवकाला बेदम मारहाण

     अहमदनगर (हिवरेबाजार)- हिवरे बाजार येथे राहणारे सागर अंकुश पादिर पूर्वी जमिनीचा वाद होता, त्याचाच राग धरून टाकळी खादगाव दत्तवाडी येथे एका स्विफ्ट गाडीमधून आलेल्या पाच-सहा लोकांनी येऊन मला अडून दांडगे व तलवार घेऊन गोपीनाथ नामदेव ठाणगे, जालिंदर गोपीनाथ ठाणगे,  गणेश गोपीनाथ ठाणगे व एक अनोळखी  व्यक्ती यांनी मला मारहाण करायची सुरुवात केली व पाठीवर तलवार यांनी वार केले.

मला खाली पाडून मारले व  त्यावेळी आरडाओरडा केला असतांना गावातील काही लोकांनी मला वाचवलं. जखमी सागर महेश अंकुश याला शासकीय रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. या संदर्भात एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे.

     जर त्यांच्यावर कारवाई करुन अटक केली नाही तर मी माननीय पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयातील उपोषणाला बसणार आहे असा इशारा सागर अंकुश पादिर यांनी अशा इशारा दिला आहे.