Wednesday, September 27, 2023
HomeAHMEDNAGARAhmednagar BJP: भाजपाने पदाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना ताकद दिली आहे-शिवाजीराव कर्डिले

Ahmednagar BJP: भाजपाने पदाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना ताकद दिली आहे-शिवाजीराव कर्डिले

Ahmednagar BJP: भाजपाने पदाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना ताकद दिली आहे-शिवाजीराव कर्डिले

Ahmednagar BJP: अ‍ॅड.विवेक नाईक यांची प्रदेश भाजपच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार

Ahmednagar BJP: अहमदनगर (प्रतिनिधी) – भाजपा हा शिस्तबद्ध पक्ष असून, पक्षात काम करणार्‍या कार्यकर्त्यांना त्यांच्या कार्यकर्तुत्वाने पदाच्या माध्यमातून न्याय दिला जातो. त्यामुळे कार्यकर्त्यांनी पदासाठी काम न करता मिळालेल्या पदाचा उपयोग जनतेची कामे करण्यासाठी करावा. पक्षासाठी दिलेले योगदान पक्ष कधीही विसरत नाही. कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम पक्षाने नेहमी केले आहे. अ‍ॅड.विवेक नाईक यांनी शेवगाव सारख्या ग्रामीण भागातून भाजपा पक्षाच्या कार्यास सुरुवात केली. पदाची अपेक्षा न बाळगता केलेल्या कामांमुळे त्यांच्यावर वेळवेळी पक्षाने वेगवेगळ्या जबाबदार्‍या सोपवल्या. कार्यकर्ता कसा असावा, हे अ‍ॅड.विवेक नाईक यांच्याकडे पाहिल्यावर दिसून येते. आताही भाजपा पक्षाच्या निमंत्रित सदस्यपदी त्यांची झालेली निवड ते आपल्या कामातून सार्थ ठरवितील, असा विश्वास जिल्हा बँकेचे अध्यक्ष माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी नगर शहर भाजपचे संघटन सरचिटणीस अ‍ॅड.विवेक नाईक यांची प्रदेश भाजपच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवाजीराव कर्डिले, आमदार राम शिंदे, जामखेड मार्केट कमिटीचे संचालक गौतम उटेकर, सचिन घुमरे, भाजपा युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष बापू माने आदि उपस्थित होते.

याप्रसंगी राम शिंदे म्हणाले, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने काम सुरु आहे. पक्षाचे ध्येय-धोरणे जनसामान्यपर्यंत पोहचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे. आपल्या कार्यची निश्चित दखल घेत पदाची जबाबदारी पक्ष संघटन आपणास देईल. अ‍ॅड. विवेक नाईक यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा न ठेवता काम करत राहिल्याने त्यांना विविध पदे मिळत गेली आता प्रदेश पातळीवर काम करण्याची संधी मिळत आहे. ते हिही जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडतील, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी अ‍ॅड.विवेक नाईक म्हणाले, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेश भाजपच्या विशेष निमंत्रित सदस्यपदी मला नियुक्त करून माझ्यावर मोठा विश्वास व्यक्त केला आहे. या विश्वासाला पात्र रहात भारतीय जनता पार्टीचे काम सर्वदूर वाढवणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ज्येष्ठांचे आपणास कायम मार्गदर्शन राहील, असे सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments