
Ahmednagar NCP: अहमदनगर (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीचे झालेले दोन गट आणि दोन्ही गटातून होत असलेल्या बडतर्फी आणि नियुक्त्या आता सुरु झालेल्या असून एकीकडे शरद पवार गट ज्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला म्हणजेच आपल्या अहमदनगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या समर्थक पदाधिकारी यांना शरद पवार गट राष्ट्रवादीतून बडतर्फ करण्यात आले होते.
दुसरीकडे आमदार संग्राम जगताप यांनी अजित पवार गट राष्ट्रवादीत या पदाधिकाऱयांची नियुक्ती करून घेतली आहे. एकीकडे शरद पवार गट राष्ट्रवादीचे बडतर्फ पदाधिकारी दुसरीकडे अजित पवार गट राष्ट्रवादीचे नियुक्त पदाधिकारी झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या शहर जिल्हाध्यक्ष पदी प्रा. माणिकराव विधाते व कार्याध्यक्षपदी अभिजित खोसे यांची निवड, उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान.
शरद पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेसमधून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले होते बडतर्फ.निवडीचे पत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी आ.संग्राम जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.