Wednesday, September 27, 2023
HomeAHMEDNAGARAhmednagar News: नाशिक विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्षपदी सुधीर लंके

Ahmednagar News: नाशिक विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्षपदी सुधीर लंके

Ahmednagar News: नाशिक विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्षपदी सुधीर लंके

Ahmednagar News: विभागीय माहिती कार्यालयात ही निवड बिनविरोध करण्यात आली

Ahmednagar News: अहमदनगर : नाशिक विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी ‘लोकमत’च्या अहमदनगर आवृत्तीचे निवासी संपादक सुधीर लंके यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नाशिक विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्ष निवडीसाठी मंगळवारी नाशिक येथील विभागीय माहिती कार्यालयात बैठक झाली. त्यात ही निवड बिनविरोध करण्यात आली.

अध्यक्ष निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी समितीचे सदस्य किरण लोखंडे यांनी अध्यक्षपदासाठी सुधीर लंके यांच्या नावाची सूचना केली. त्यांच्या सुचनेला सर्व सदस्यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर लंके यांची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.

सदर निवडणूक प्रक्रिया विभागीय माहिती कार्यालय, नाशिकचे उपसंचालक (माहिती) ज्ञानेश्वर इगवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी समिती सदस्य विजयसिंह होलम, अभिजित कुलकर्णी, किरण लोखंडे, सहायक संचालक मोहिनी राणे उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments