Wednesday, September 27, 2023
HomeAHMEDNAGARAhmednagar News: गणेश कारखाना निवडणुकीत विखे पाटलांना धक्का थोरात कोल्हे पॅनल विजयी

Ahmednagar News: गणेश कारखाना निवडणुकीत विखे पाटलांना धक्का थोरात कोल्हे पॅनल विजयी

Ahmednagar News: गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुकीत महसूल मंत्री राधकृष्ण विखे पाटील आणि भाजप खासदार सुजय विखे पाटीलयांना मोठा धक्का बसला आहे. राहता मतदारसंघातील गणेश सहकारी साखर कारखाना निवडणुक थोरात आणि कोल्हे पॅनलने मिळवला आहे.

विखे पाटलांच्या ताब्यात असलेली सत्ता खेचण्यासाठी काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि भाजपच्या कोल्हे गटाने आघाडी केली होती. यामुळे विखे प्रणित जनसेवा मंडळ पॅनलला मोठा धक्का बसला आहे.

एकूण 19 जागापैकी 8 जागा जिंकत थोरात आणि कोल्हे पॅनलने ही विजय मिळवला आहे. ऊस उत्पादक गट राहतामध्ये थोरात गटाचे तीनही उमेदवार विजयी झाले आहे.

सभासदांनी दडपशाहीचे झाकण आज उडवले : थोरात

थोरात म्हणाले, वीरभद्र मंदिराच्या प्रांगणात प्रचार सभेला परवानगी दिली नाही. प्रशासनाने नेहमी निरपेक्ष राहिले पाहिजे. सत्ताधार्‍यांच्या दडपशाहीला बळी पडू नये. या परिसरात दहशतीचे आणि दडपशाहीचे राजकारण आहे. मात्र गणेश परिसरातील सभासदांनी दडपशाहीचे झाकण आज उडवले आहे. या परिसराला स्वातंत्र्य मिळाले आहे. सभासदांबरोबर सर्वसामान्य कार्यकर्ता ही या निवडणुकीत अगदी सक्रिय झाले होते. हा विजय सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा व सभासदांचा असून परिवर्तनाची सुरुवात झाली आहे.

पुढे बोलतांना थोरात म्हणाले, महसूल खाते आपण सर्वाधिक काळ सांभाळले. मात्र कुणावर केसेस केल्या नाही. दडपशाहीचे राजकारण कधी केले नाही.

प्रेमाचे राजकारण आणि चांगला हेतू ठेवून आपण काम करतो. या परिसरात आनंद निर्माण व्हावा हाच आपला उद्देश आहे.
निळवंडे धरणात १०,००० एमटीएफसी पाणी शिल्लक असताना अवघे २०० एमटीएफसी पाणी सोडले. आम्ही आनंदात सहभागी झालो तर पाणी बंद केले.

पाणी सुरू राहिले असते तर शेतकर्‍यांच्या आनंदच मिळाला असता विहिरींना पाणी आले असते परंतु त्यांना आनंद पहावत नाही. असे ते म्हणाले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments