Darshak News
World Wide News

Ahmednagar Police: एकाच रात्री दोन ठिकाणी चोरी करणार्‍या सराईत आरोपींचा समावेश असलेली आंतरजिल्हा टोळी जेरबंद

Ahmednagar Police: एकाच रात्री दोन ठिकाणी चोरी करणार्‍या सराईत आरोपींचा समावेश असलेली आंतरजिल्हा टोळी जेरबंद

Ahmednagar Police: अहमदनगर (प्रतिनिधी) : एमआयडीसी परिसरात एकाच रात्री दोन ठिकाणी चोरी करणार्‍या सराईत आरोपींचा समावेश असलेली आंतरजिल्हा टोळी जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. त्यांच्याकडून 6 लाख 36 हजार 643 रुपये किंमतीचे सोलार मोटार पंप युनिट व टेम्पो हस्तगत केला आहे.

पोलिसांनी शुभम महादेव खोत (वय 25, रा. टाकळी अंबड, ता. पैठण, जिल्हा औरंगाबाद, हल्ली रा. राज हॉटेल, वनराई कॉलनी, एमआयडीसी), अक्षय बंडु कुर्‍हाडे (वय 24, रा. टाकळी अंबड, ता. पैठण, जिल्हा औरंगाबाद, हल्ली रा. वैदुवाडी, भिस्तबाग, सावेडी), राहुल भाऊसाहेब नेटके (वय 20, रा. देवगाव, ता. नेवासा, हल्ली रा. मनोरमा कॉलनी, नागापुर, एमआयडीसी) यांना ताब्यात घेतले आहे.

8 नोव्हेंबर 2022 रोजी एमआयडीसी अहमदनगर येथून फिर्यादी विजय पोपट घोरपडे (वय 40, धंदा ट्रान्सपोर्ट, रा. माऊली बंगला, विद्या टॉवर शेजारी, नगर कल्याण रोड, अहमदनगर) यांनी एमआयडीसी येथील प्लॉट नं. 19 जवळ लावलेला मालवाहतूक टेम्पो अज्ञात इसमांनी चोरी करुन नेला होता.

तसेच त्याच रात्री फिर्यादी विजयसिंग गुरदिपसिंग सॅम्बी (वय 65, धंदा कंपनी व्यवसाय, रा. डॉक्टर्स कॉलनी, बुरुडगांव रोड, अहमदनगर) यांचे कंपनीतील सोलार मोटार पंप, कंट्रोलर व केबल असा दोन्ही गुन्ह्यातील मिळुन एकुण 7,45,024 रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञातांनी चोरुन नेला होता. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे चोरीचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शोखेचे पोनि अनिल कटके यांना दोन्ही गुन्ह्यांचा समांतर तपासा करणे करीता स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते.

त्यानुसार कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई सोपान गोरे, सफौ मनोहर शेजवळ, पोहेकॉ संदीप पवार, बापुसाहेब फोलाणे, दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, देवेंद्र शेलार, फकिर शेख, पोना शंकर चौधरी, भिमराज खर्से, लक्ष्मण खोकले, दीपक शिंदे, पोकॉ योगेश सातपुते, मच्छिंद्र बर्डे, मेघराज कोल्हे, विनोद मासाळकर, मयुर गायकवाड, चापोहेकॉ संभाजी कोतकर, अर्जुन बडे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन दोन्ही गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणे बाबत सुचना व मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले.

पथक अहमदनगर शहर व एमआयडीसी परिसरात पेट्रोलिंग करुन आरोपींची माहिती घेत असतांना पोनि अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, इसम नामे शुभम खोत हा साथीदारासह एका चोरीच्या टेम्पोमध्ये एमआयडीसी येथील गोडावुन मधुन चोरलेला माल भरुन नगर औरंगाबाद रोडने जात आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि कटके यांनी सदर माहिती पथकास कळवुन, खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले.

पथक वाहनातून नगर औरंगाबाद रोडने जात असतांना जेऊर गांवचे शिवारात टेम्पोमध्ये मागिल बाजुस काही वस्तु झाकुन व एक मोटार सायकल घेवुन जातांना दिसला. टेम्पोस ओव्हरटेक करुन गाडी आडवी लाऊन थांबविले असता टेम्पोमध्ये बसलेले तीन इसम पथकास पाहुन पळुन जावु लागले. त्यांचा शिताफीने पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले. सुरवातील त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. संशय बळावल्याने त्यांची पोलिसांनी बारकारईने सखोल चौकशी केली असता त्यांनी एमआयडीसी येथुन टेम्पो चोरी केला असुन त्यामध्ये एमआयडीसी येथील गोडावुन मधुन चोरी केलेल्या मोटार कंट्रोलर व केबल घेवुन जात आहे अशी कबुली दिली.

मुद्देमालासह आरोपींना एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील कारवाई एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहे. आरोपी शुभम महादेव खोत यांच्यावर विविध पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: