Wednesday, September 27, 2023
HomeAHMEDNAGARAhmednagar Shivsena: आगामी निवडणुकीत मनपावर युतीचा झेंडा फडकविणार : अ‍ॅड.अभय आगरकर

Ahmednagar Shivsena: आगामी निवडणुकीत मनपावर युतीचा झेंडा फडकविणार : अ‍ॅड.अभय आगरकर

Ahmednagar Shivsena: आगामी निवडणुकीत मनपावर युतीचा झेंडा फडकविणार : अ‍ॅड.अभय आगरकर

Ahmednagar Shivsena: शिवसेनेच्यावतीने भाजपाचे नूतन शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर यांचा सत्कार

Ahmednagar Shivsena: अहमदनगर (प्रतिनिधी): गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना-भाजपाची युती राहिली आहे. राज्यात मागिल घडमोडीमुळे या युतीला ब्रेक लागला होता, परंतु आता मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप-सेना युतीचे सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर अनेक कामांना वेग आला आहे. भाजप-सेनेची ही युती नेहमीच अभेद्य राहिली आहे. नगरमध्येही युतीच्या माध्यमातून अनेक स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, महानगरपालिकेत सत्ता मिळविली होती.

भविष्यातही भाजप-सेनेची युती कायम ठेवून यापुढील काळात मनपावर युतीचा झेंडा फडविण्यात येईल, असे प्रतिपादन भाजपाचे नूतन शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर यांनी केले. नगर शहर शिवसेनेच्यावतीने भाजपाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अ‍ॅड.अभय आगरकर यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिवसेनेचे राज्य सचिव संजय मोरे, जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, संपर्कप्रमुख सचिन जाधव, शहरप्रमुख दिलीप सातपुते, महिला आघाडीच्या कला शिंदे, भाजपाचे महेश नामदे आदि उपस्थित होते.

याप्रसंगी शहरप्रमुख दिलीप सातपुते म्हणाले, केंद्रात आणि राज्यात शिवसेना-भाजपाचे सरकार असल्याने अनेक विकास कामांना चालना मिळाली आहे. त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवरही सेना-भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते युतीच्या माध्यमातून एकत्रित काम करत आहेत. यापुढील काळात होणार्‍या निवडणुका या एकत्रितपणे लढविल्या जातील. भाजपाचे नुतन शहर जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर यांनी भाजप-सेना युतीमध्ये महत्वाची भुमिका बजावलेली आहे.

यापुढील काळातही ते भाजपाचे संघटन मजबूत करण्याबरोबरच सेना-भाजप युतीस पुरक अशी भुमिका घेतील, असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी संजय मोरे म्हणाले, राज्यात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेऊन महाराष्ट्राला वेगवान बनवत आहेत. स्थानिक पातळीवरही सेना-भाजप युतीच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी एकत्रित पुढाकार घेऊ. नगरमधील युतीच्या सर्वच पदाधिकार्‍यांना वरिष्ठ पातळीवरुन ताकद देण्याचे काम करु असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन जाधव यांनी केले तर महेश नामदे यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments