
Ahmednagar Urdu School: अहमदनगर (प्रतिनिधी): मुुकुंदनगर येथील मोहंमदिया एज्युकेशन सोसायटीच्या सावित्रीबाई फुले उर्दु प्राथमिक कन्या शाळा, मौलाना आझाद उर्दु मुलींचे हायस्कुल,मदर तेरेसा उर्दु ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस्,कॉमर्स् अॅण्ड सायन्स् फॉर गर्ल्स
मासुमिया डी.एल. एड्.कॉलेज (उर्दु)व मासुमिया शिक्षणशास्त्र महाविद्यालय, वाबळे कॉलनी, मुकुंदनगर, अहमदनगर येथे मुकुंदनगर भागातून घर घर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.अब्दुस सलाम सर, मुख्याध्यापिका सय्यद फरहाना नाज मुज्जफर, मुख्याध्यापक सय्यद नौशाद अहमद,
हसिब सर, अस्लम पटेल, फरिदा जहागिरदार, नाजेमा इकबाल, नाजेमा जुल्फेकार, वहिदा बाजी, बहार अंजुम,अंजुम खान, शाहिन बाजी, फरजाना बाजी, हिना बाजी, तल्मीज सैय्यद , मोना बाजी, मुमताज बाजी वसिम सर आदिंसह विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
याप्रसंगी प्रा.डॉ. अब्दुस सलाम सर म्हणाले आज आपण स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करत आहोत.देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळाले.
त्यांचे बलिदान कधीही विसरता काम नये. स्वातंत्र्य दिनानिमित्त तिरंगा रॅली काढून सर्वांमध्ये देशभक्तीची मशाल जागृत ठेवून देशाप्रती आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे.
प्रत्येकाने आपल्या घरावर, कार्यालयावर तिरंगा ध्वज फडवून देशाप्रती आपला कृतज्ञता भाव व्यक्त करावा असे आवाहन केले.यावेळी विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या उत्साहात या तिरंगा रॅलीत सहभागी होत, हातात फलक घेत व घोषणा देत जनजागृती केली.