
Alfa Pratishthan: अहमदनगर (प्रतिनिधी) – आमदार संग्राम जगताप यांचा वाढदिवसानिमित्त अल्फा प्रतिष्ठानच्यावतीने अध्यक्ष निसार मास्टर यांनी सत्कार केला. याप्रसंगी अन्सार मास्टर आदि उपस्थित होते.
याप्रसंगी निसार मास्टर म्हणाले, आमदार संग्राम जगताप यांनी अल्पवधीत शहराच्या सर्वांगिण विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. आपल्या दृष्टीने शहराला विकसित करण्याचा सुरु असलेले प्रयत्न कौतुकास्पद असेच आहेत. त्यांचे धडाकेबाजा कार्य हे सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे, असे सांगून त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार संग्राम जगताप यांनीही सामाजिक कार्यकर्ता निसार मास्टर यांच्याशी व्यसनमुक्ती चळवळीबाबत चर्चा करुन ही चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी आपणही सक्रीय सहभाग देऊ असे सांगितले.