Darshak News
World Wide News
AMC: मनपाचे लाखो रुपयांचे जेसीबी वाहन चालकां अभावी धूळखात पडल्याने शहरातील कामे ठप्प पडली -निखिल वारे

AMC: मनपाचे लाखो रुपयांचे जेसीबी वाहन चालकां अभावी धूळखात पडल्याने शहरातील कामे ठप्प पडली -निखिल वारे

 AMC: अहमदनगर (प्रतिनिधी) – अहमदनगर महानगरपालिकेच्या कारभारावर रोज टिका-टिपणी होते तरी त्यामध्ये सुधारणा होण्याऐवजी अजून ढिसाळ कारभार पहायला मिळतो. मनपाने शहरातील विविध कामांसाठी नवीन जे.सी.बी. खरेदी केली. पण वाहन चालकांअभावी लाखो रुपये ही यंत्रसामुग्री धूळखात पडल्याने कचरा संकलन असो. या इतर कामे ठप्प पडली आहे. 2 दिवसात ड्रायव्हर उपलब्ध न केल्यास मनपात आंदोलन करण्याचा इशारा माजी नगरसेवक निखिल वारे यांनी पत्रकाद्वारे दिला.

 या पत्रकात त्यांनी म्हटले की, मनपाने वाहन चालक उपलब्ध होत नसल्याने घनकचरा व्यवस्थापन विभागाने टेंडर काढून कुशल वाहनचालक खाजगी संस्थेमार्फत भरले. तरीही ठेकेदाराकडून 1नोव्हेंबर पासून 

जेसीबी च्या वाहनांवर ड्रायव्हर उपलब्ध नाहीत. त्यामुळे शहर व उपनगरातील कचरा संकलन, खोदाई, वाहतुकीची सर्व कामे ठप्प झाली तरी मनपाचे अधिकारी त्या ठेकेदारावर कारवाई का करीत नाही? त्या ठेकेदाराचे लांगुनचालन का करता? असा प्रश्न श्री.वारे यांनी उपस्थित केला आहे.

 येत्या दोन दिवसात मनपाने जेसीबी च्या वाहनांवर ड्रायव्हर उपलब्ध न केल्यास प्रभाग दोन मधील नगरसेवकांसह, नागरिक आंदोलन करतील, असा इशारा निखिल वारे यांनी दिला.

AMC: आंदोलनाचा इशारा देताच प्रशासनास जाग

 पत्र प्रसिद्धीस देण्यापूर्वी श्री.वारे यांनी मनपाच्या अधिकार्यांना कल्पना दिली आणि आंदोलन करणार या धसक्याने मनपा यंत्रणा खडबडून जागी झाली व लगेच जेसीबी वर वाहन चालक देऊन कामास सुरुवात केली, पण यामध्ये सातत्य राहिले पाहिजे, असे श्री.वारे यांनी म्हटले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: