Darshak News
World Wide News
Amhi Ahmednagarkar: "आम्ही अहमदनगरच्या"वतीने कर्तृत्ववान युवक गुणवंतांचा सत्कार

Amhi Ahmednagarkar: “आम्ही अहमदनगरच्या”वतीने कर्तृत्ववान युवक गुणवंतांचा सत्कार

Amhi Ahmednagarkar: "आम्ही अहमदनगरच्या"वतीने कर्तृत्ववान युवक गुणवंतांचा सत्कार
Amhi Ahmednagarkar Photo

Amhi Ahmednagarkar: सिनेनाट्य अभिनेते प्रकाश धोत्रेंसह साहित्य अकादमी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त प्रा. डॉ. मोहम्मद आझ़म यांची उपस्थिती !

Amhi Ahmednagarkar: अहमदनगर (प्रतिनिधी) येथील ‘आम्ही अहमदनगर’ यांच्यावतीने कर्तृत्ववान युवक प्रणित संध्या दिपक मेढे आणि शंकर शिल्पा अभिजीत वाघ यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. विजय तेंडुलकर लिखित ‘घाशीराम कोतवाल’मधील मुख्य कलाकार सिनेनाट्य अभिनेते प्रकाश धोत्रे यांच्या हस्ते होणार असून समारंभाचे अध्यक्ष साहित्य अकादमी राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त प्रा. डॉ. मोहम्मद आझ़म हे आहेत.

प्रणित मेढे आणि सहकारी यांच्या ‘कुंकूमार्चन’ या सामाजिक चित्रपटास नुकताच राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाला आहे. शंकर वाघ हे सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्या वास्तुविशारद (आर्किटेक्ट) च्या नाटा या प्रवेशपरिक्षेत विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्याला सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथे प्रवेश मिळाला आहे.

प्रणित व शंकर या कर्तृत्ववान युवकांच्या कष्टाचे चिज झालेले असून त्याचा अहमदनगरांच्या वतीने कौतुकसोहळा आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम रविवार दि.१३ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५:३० वाजता रहेमत सुलतान हॉल, सर्जेपुरा, अहमदनगर येथे आयोजित केलेला असून शहरवासीयांच्या सहभागी होण्याचे आवाहन संजय झिंजे, युनूस तांबटकर, असिफखान दूलेखान, कॉ. प्रा. डॉ. महेबुब सय्यद, रामदास वागस्कर, दलजितसिंह वधवा, भैरवनाथ वाकळे आदी ‘आम्ही अहमदनगरकर’ यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: