
Ankur School: अहमदनगर (प्रतिनिधी): शहरातील यशवंत काॅलनी येथील अंकूर प्राथमिक शाळेत संस्थेचे सर्व मान्यवर, पालक, विद्यार्थी बंधू आणि भगिनींच्या उपस्थितीत मंगळवारी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला.
या निमित्ताने शाळेमध्ये मुंबईचे आरटीओ इन्स्पेक्टर प्रदीप बन्सी नन्नवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार जी. एन. शेख जहागिरदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
भारतीय स्वातंत्र्याने आता शतकपूर्तीकडे वाटचाल सुरू केली आहे. या वाटचालीमध्ये शिक्षक, विद्यार्थी व पालकांनी मोठ्या हिरीरीने भाग घेतला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम आयोजित केली होती शेवटी शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत नन्नवरे यांनी प्रमुख पाहुणे, विद्यार्थी, पालक व शिक्षक वर्गांचे आभार मानले.