Sunday, September 24, 2023
HomeAHMEDNAGARArt of Living: श्री श्रींच्या सानिध्यात "आनंद उत्सव" ध्यान मंदिरात 8 ते...

Art of Living: श्री श्रींच्या सानिध्यात “आनंद उत्सव” ध्यान मंदिरात 8 ते 13 ऑगस्ट दरम्यान शिबीर

Art of Living: श्री श्रींच्या सानिध्यात "आनंद उत्सव" ध्यान मंदिरात 8 ते 13 ऑगस्ट दरम्यान शिबीर

Art of Living: आनंदाने जगण्याची कला शिकण्याचा छंद जोपासणे सध्या गरजेचे

Art of Living: अहमदनगर (प्रतिनिधी): आनंदाने जगण्याची कला शिकण्याचा छंद जोपासणे सध्या गरजेचे झाले आहे. दैनंदिन जीवनात संघर्ष, ताण-तणाव, व्यसनमुक्तीसाठी आपणहून केलेले प्रयत्न, नैराश्य व चिंता या गोष्टी होत असतात.

आर्ट ऑफ लिव्हींगच्या आनंद उत्सव या शिबीराद्वारे श्री श्री रविशंकरजी लाईव्ह वेबद्वारे मार्गदर्शन करणार आहेत तसेच त्यांच्या सानिध्यात व त्यांचे प्रेरणेने ठिकठिकाणी शिबीराचे आयोजन होत आहे, शारीरिक मानसिक स्तरावर कार्य करणाऱ्या सुदर्शन क्रिया शिबीर अनेक शिबिरांना चांगला प्रतिसाद देखील मिळाला.

आपल्या स्वस्थ आणि निरोगी राहण्यासाठी जीवनशैली बदलण्यासाठी योग आणि प्राणायम प्राचीन भारतीय पद्धतीचा अबलंब करणे गरजेचे आहे, ज्याद्वारे शरीर, मन चांगले राहते आणि विचार करण्याची क्षमता, योग्य निर्णय घेण्यासाठी समर्थ बनविते. शारिरीक व मानसिक स्वास्थासाठी याचा अवलंब करावा, आपले शरीर सूक्ष्म प्राणशक्तींशी संबंधित असल्याने त्यांचा सराव नियमीत केल्या मानसिक शांती व आरोग्य चांगले राहते, सध्याच्या गतीमान जीवनशैलीमुळे आपले जीवन धकाधकीचे झालेले असून प्रत्येक स्तरावर ताण-तणाव, नैराश्य, चिंता या अश्या अनेक कारणांमुळे आपले आरोग्य बिघडत चालले आहे.

निसर्गात होणार्‍या बदलामुळे आपले शरीरात वात, कम, पित्त यामध्ये सुद्धा बदल होत असतात. आज प्रत्येकाला यशस्वी होण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, त्यामुळे आनंदमयी आयुष्य जगायचे असेल तर आपल्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलावे लागेल. नियमीत सुर्यनमस्कार, व्यायाम केल्याने आपले शरीर व मनशांती ध्यानाद्वारे टिकून ठेवता येणे शक्य आहे. निरंतर योग साधना करण्यार्‍या माणसांची ऊर्जा चांगली राहते, प्राण म्हणजे आपले जीवन शक्ती होय तर आयाम म्हणजे तिला नियंत्रीत करण्यासाठी केलेली क्रिया. श्‍वसनाच्या माध्यमातून प्राणावर नियंत्रण प्राप्त करणे प्राणायम होय.

याशिबीरात सुदर्शन क्रिया शिकवली जाते, ही क्रिया अनेक रोगांवर एक उपचार म्हणून कार्य करते हे जागतीक आरोग्य संघटनेने सांगितलेले आहे. योगासनामुळे शरीराच्या प्रत्येक भागाला क्रियाशील बनवते त्यामुळे आपण निरोगी राहतो. स्पर्धाच्या या काळात तणावमु्नत मन, नकारात्मक विचारांपासून दूर असणे आज क्रमप्राप्त झाले आहे.

आजपर्यंत अनेक लोकांनी याचा लाभ घेतला आहे आणि आपले जीवन सुखी-समृद्धीत जगत आहेत. शहराच्या सावेडी येथील आर्ट ऑम लिव्हिंग ध्यान मंदिर, गावडे मळा याठिकाणी दि. 8 ते 13 ऑगस्ट दरम्यान सकाळी आणि सायं. 6 ते 9 शिबीर होत असून याशिबीराचा जास्तीत जास्त साधकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अहमदनगरचे प्रशिक्षक कृष्णा पेंडम यांच्या वतीने करण्यात येत आहे. शिबीरासाठी नांव नोंदणी संपर्क 8999149061, 9422220874 यांचेकडे करावे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments