
Ashadhi Wari: विजेता क्रिकेट क्लबच्यावतीने वारकर्यांना छत्र्यांचे वाटप
Ashadhi Wari: अहमदनगर (प्रतिनिधी) – आषाढी एकदाशी आली की, वारकर्यांना पंढरीच्या विठ्ठलाच्या भेटीची आस लागत असते. लाखोंच्या संख्येने वारकरी पायी दिंडीने पंढरपुला जातात. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता हे वारकरी न थकता शेकडो मैल प्रवास करतात. आपल्या लाडक्या पांडूरंगाला भेटची आस लागली असल्याने तहान-भुक हरपून चालत राहतात. विजेता क्रिकेट क्लबच्यावतीने वारकर्यांचे उन-पावसापासून संरक्षण व्हावे, यासाठी छत्री देण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. या वारकर्यांची सेवा केल्याने पुण्य मिळत असल्याने त्यांच्या सेवेत धन्यता मानली आहे, असे प्रतिपादन उद्योजक अतुल शिंगवी यांनी केले.
विजेता क्रिकेट क्लब यांच्यावतीने श्री संत शिरोमणी नामदेव महाराज पायी नगर ते पंढरपुर दिंडीतील वारकर्यांना आनंदधाम समोर छत्री वाटप करण्यात आले. याप्रसंगी उद्योजक अतुल शिंगवी, विनित बोरा, नगरसेवक विपुल शेटीया, मर्चंटस् बँकेचे संचालक कमलेश भंडारी, जैन ओसवाल पतसंस्थेचे चेअरमन किरण शिंगी, माजी नगरसेवक किशोर बोरा, राहुल भंडारी, विलास कटारिया, अमोल शिंगी, श्रेयस पितळे, पियुष लुंकड, क्लबचे हर्ष बोरा, प्रशांत मुथा, भरत पवार, रोनक खंडेलवाल, ओजस बोरा, यश कासलीवाल, बाळू बोगावत, यश मुथ्था, निखिल सावज, आकाश मुनोत, रोहन गंगवाल, वृषभ कटारिया, देवेन शिंगी, सुजय गांधी आदिंसह दिंडी चालक हभप जनार्दन महाराज माळवदे उपस्थित होते.
अमोल शिंगी म्हणाले, विजेता क्रिकेट क्लबच्या माध्यमातून युवकांना मैदानी खेळांसाठी प्रोत्साहन देत असते. त्याचबरोबर सामाजिक दायित्व जपत वर्षभर गरजूंना मदतीचा हात देत असते. सण, समारंभ, उत्सवामध्येही सहभागी होत उपक्रम राबविले जात असतात. कोरोना काळातही गरजवंतांना किरणा वाटप करण्यात आले. तसेच बंदोबस्तास असलेल्या पोलिसांनही चवनप्राश, ड्रायफ्रुटचे वाटप केले होते. यंदाच्या वर्षी वारकर्यांना छत्र्यांचे वाटप करुन त्यांचा प्रवास सुखकर करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगितले.
याप्रसंगी विपुल शेटीया, कमलेश भंडारी,विनित बोरा यांनीही विजेता क्रिकेट क्लब नेहमीच सामाजिक उपक्रमात सहभागी होत विविध उपक्रम राबवत असतात. आजच्या वारकर्यांना वाटप करण्याचा स्त्युत्य उपक्रम राबविला आहे.
यावेळी वारकर्यांना छत्र्याबरोबर, लस्सी वाटप करण्यात आली. यासाठी विजेत्या क्रिकेट क्लबच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. शेवटी किशोर बोरा यांनी आभार मानले.