
कार्यकर्त्यानी आपल्या खांदयावर पालखी घेऊन मंडळात आणली
AshadiWari: अहमदनगर (प्रतिनिधी)-मधील खिस्तगल्ली कारंजा येथील वर्धमान तरुण मंडळाच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथील निवृत्ती महाराज दिंडीचे कापडबाजार येथे आगमन झाल्यावर कार्यकर्त्यानी आपल्या खांदयावर पालखी घेऊन मंडळात आणली व तिचे स्वागत करून पूजन केले व सर्व वारकर्यांना अल्पोपहार देण्यात आला
यावेळी बाळासाहेब चंगेडे, अतुल भंडारी,किरण शिंगी,किशोर बोरा,भूषण चंगेडे,प्रवीण कोठारी,प्रज्योत भंडारी,अजय कटारिया,नक्षत्र शिंगी,वस्तूपाल गांधी,पवन फिरोदिया,अमोल शिंगी, संतोष भंडारी, हरीश भाटे,राजेंद्र बुब,संजय गुगळे,दिलीप चंगेडिया,अजित शिंगवी, तनिष्क कोठारी,ओमकार देहरादाय ,कुणाल शिंगी, अक्षय चंगेडे, ध्रुव कावरीया,श्रेणिक शहा,अक्षय चंगेडिया, मन चंगेडिया आदींसह असंख्य कार्यकर्ते महिला व पुरुष उपस्थित होते.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी हि उत्साहात स्वागत करून अल्पोपहार देण्यात आला
यावेळी दिंडीतील मानकर्त्यांच्या सत्कार करण्यात आला दरवर्षी प्रमाणे यावर्षी हि उत्साहात स्वागत करून अल्पोपहार देण्यात आला यावेळी बाळासाहेब चंगेडे यांनी सांगितले कि आम्ही दिंडीची आतुरतेने वाट पाहत असतो, वारकर्यांची सेवा केल्याने आत्मिक समाधान लाभते त्याच्यात आम्ही प्रत्यक्ष देव पाहतो.
आषाढी वारी म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर पर्यंत केलेली पदयात्रा होय. वारकरी संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारीमध्ये अनेक जाति-धर्माचे लोक भाविक भक्त सुद्धा जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात.वारी हा एक आनंद सोहळा आहे
महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक पदयात्रा होय वारी एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते.तसेच त्र्यंबकेश्वर येथून निवृत्तीनाथ वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत होत.
त्या दिंडीचे स्वागत व सेवा करायला आम्हाला संधी मिळते हे आमचे भाग्य आहे ,वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही.तसेच नामजपाने पुण्य मिळते हा भाव आहे. जो नियमित वारी करतो तो वारकरी. वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात. वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हटले जाते.पंढरीचा वास,चंद्रभागेस्नान,आणिक दर्शन विठोबाचे या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत,अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे.त्यामुळेच आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिलापुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे