
Bhingar: भिंगार येथे श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा संपन्न
Bhingar: अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार शिंपी समाजाच्या वतीने श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा 673 वा संजिवन समाधी सोहळा संपन्न झाला. या निमित्त आयोजित सप्ताहात दररोज हरीपाठ, भजन, किर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुण्यतिथीदिनी दिंडी प्रदक्षिणा, भजन, काल्याचे किर्तन झाले. यानंतर आमदार संग्राम जगताप व बेलेश्वर कंस्ट्रकशन्सचे महेश झोडगे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.याप्रसंगी मतीन शेख, सुदाम गांधले, दिपक लिपाने, प्रमोद आठवाल आदि उपस्थित होते.
संत नामदेव महाराजांनी देशभरात धर्म कार्य केले
याप्रसंगी आ.संग्राम जगताप म्हणाले, संत नामदेव महाराजांनी देशभरात धर्म कार्य केले. त्यांचे विचार आजही आपणासाठी मार्गदर्शन आहेत. संतांनी आपणास सर्वकाही दिले आहे. आपली हिंदू संस्कृती महान आहे, या संस्कृतीचे जतन झाले पाहिजे. यासाठी अशा धार्मिक उपक्रमांची गरज आहे. याचबरोबर समाजोपयोगी उपक्रमातून समाजाचे हित जोपासणेही महत्वाचे आहे. कृतीतून संतांचे विचार समाजपर्यंत पोहचविण्याचा काम अशा कार्यक्रमातून होत आहे, असे सांगून मंदिराला दिलेल्या नियोजित सभामंडपाचे काम लवकरच सुरू होईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
सप्ताह निमित्त श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या अभंग लिहिणे स्पर्धा ठेवण्यात आली होती त्याचे बक्षीस वितरणही आ. जगताप यांचे हस्ते करण्यात आले. तसेच कु.जागृती किशोर देठ हिची आयकर विभागाच्या निरीक्षक पदी चेन्नई येथे निवड झाले बद्दल तिचाही सत्कार करण्यात आला. तसेच कार्तिक देशमुख यांचाही सत्कार करण्यात आला. नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.
कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष अनिल इवळे, जिल्हा सचिव शामराव औटी, फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक जालिंदर बोरूडे आदि उपस्थित होते.
सर्वांचेआभार मंदिराचे अध्यक्ष शैलेश धोकटे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिव संतोष माळवदे, विश्वस्त दिपक देठ, संजय मिरजे, संजय म्हेत्रे, प्रशांत गुजर, मंगेश धोकटे, सुरेश चुटके, अमोल डेरे, किरण माळवदे, शिवम मिरजे, किशोर बकरे, निलेश बकरे, संजय शित्रे, योगेश शित्रे, वेदांत धोकटे, वरद धोकटे, समिर सरोदे, जेष्ठ मार्गदर्शक प्रकाश डेरे, अॅड. नारायणराव गणबोटे, रविंद्र माळवदे, विलास सरोदे, सुदर्शन कुंटे
तसेच भिंगार शिंपी समाज महिला कार्यकर्त्या सौ.शैला धोकटे, सौ.राजश्री माळवदे, सौ.भारती मिरजे, सौ.विजयालक्ष्मी गणबोटे, सौ.भारती देठ, श्रीमती.राजश्री गुजर, कार्तिकी माळवदे, अश्विनी धोकटे यांनी अथक परिश्रम घेतले. या सर्व कार्यक्रमाचा परिसरातील समाज बंधू-भगिनी व नागरिकांनी लाभ घेतला.