गणेश जयंतीनिमित्त एकदंत गणेश मंडळाच्या 103 युवकांचे रक्तदान

     अहमदनगर (प्रतिनिधी)- सालाबादप्रमाणे यावर्षीही गणेश जयंतीनिमित्त रक्तदान शिबीराचे आयोज करण्यात आले. या शिबीराचे व कार्यक्रमाचे उद्घाटन श्री एकदंत गणेश मंदिरात महाआरती करुन करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन सुनिल महनोर, डॉ शंकर मोरे उपस्थित होते. या रक्तदान शिबीरामध्ये 103 युवकांनी रक्दातन केले. गेल्या 19 वर्षापासून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येतो, प्रत्येक वर्षी 100 च्या पुढेच रक्तदान होत असते. यावर्षीही ती परंपरा कायम राहिली आहे.

     यावेळी सुनिल महानोर म्हणाले कि, 19 वर्षापासून मंडळाचे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करुन आज एकदंत गणेश मंडळाची नगरशहरात नाव कमवले आहे.  रक्तदान सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदान केल्याने आपन कोणाला तरी जीवन दान देतो.यांचा आनंद मोठा आहे. रक्तदान प्रत्येकांने वर्षातुन एकदा करावे. रक्त हे कोणत्या फॅक्टरीत तयार होत नाही. गरज भासल्यास कोणी तरी रक्तदान करावेच लागते. युवकांनी रक्तदान चळवळीत उर्त्फुतपणे सहभाग घेतल्यास रक्ताचा तुटवडा भासणार नाही. असे ते म्हणाले.

      धार्मिक कार्यक्रमा बरोबरच मंडळाने सामाजिक कार्यक्रमही घेतले आहेत. यंदा रक्तदान शिबीरात एकदंत गणेश मंडळाच्या 103 युवकांनी उर्त्फुतपणे रक्तदान केले. या रक्तदान शिबीरात एकदंत कॉलनी, दातरंगे मळा परिसरातील नागरीकांसह नगर शहर परिसरातील युवकांनी सहभाग घेतला. यावेळी 150 महिलांची हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली.  या शिबीराला आनंदऋषीजी ब्लड बँकेचे सहकार्य लाभले.  या कार्यक्रम यशस्वीतेसाठी  एकदंत मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रोशन सुंकी यांनी केले. तर आभार श्रीनिवास बुरगुल ेयांनी मानले.

————–