Darshak News
World Wide News
Chess: अहमदनगरच्या उद्योन्मुखने दिला औरंगाबादच्या इंद्रजितला पराभवाचा धक्का

Chess: अहमदनगरच्या उद्योन्मुखने दिला औरंगाबादच्या इंद्रजितला पराभवाचा धक्का

Chess: अहमदनगरच्या उद्योन्मुखने दिला औरंगाबादच्या इंद्रजितला पराभवाचा धक्का

Chess: अहमदनगर । चौथ्या दिवशी आठव्या फेरीअखेर आज नगरचा उदयोन्मुख हर्ष घाडगे याने औरंगाबादच्या मानांकित खेळाडू इंद्रजीत महेंद्रकर यास पराभवाचा धक्का देत स्पर्धेत रंगत वाढवली आहे. त्यामुळे स्पर्धेत अधिक चुरस वाढत चालली आहे. नगरचा हर्ष घाडगे, कोल्हापूरचा मानांकित खेळाडू श्रीराज भोसले, तामिळनाडचा एस. प्रसन्ना, मुंबईचा श्रेयन मुजुमदार सात गुणांसह आघाडीवर आहेत.

आज श्रीराज भोसलेला पश्चिम बंगालच्या कौस्तुभ कुंडू याने आपला डाव बरोबर रोखण्यात यश मिळवले. एस प्रसन्ना ने नगरच्या चितळकर निलेश वर सहज मात केली .मुजुमदार श्रेयनने यांने पुण्याच्या शरणार्थी वीरेश वर मात करून आघाडीवर आहे. उद्या स्पर्धेचा पाचवा व शेवटचा दिवस असून दुपारी दोन वाजता अहमदनगर जिल्हा बुध्दीबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया व मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेतील विजेत्यांना रोख बक्षिसे व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेत अनेक धक्कादायक निकाल येत आहेत त्यामुळे स्पर्धेत चुरस वाढत आहेत. स्पर्धा रंगतदार अवस्थेत आहे. उद्या या स्पर्धेत अनेक खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी व कोण स्पर्धेत आघाडीवर असेल हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

उद्या या स्पर्धेत कोण बाजी मारेल यासाठी बुद्धिबळ प्रेमी आतुर आहेत…या स्पर्धेत अनेक मानांकित , उत्कृष्ट खेळाडू यांचा खेळ पाहण्याची संधी मिळत आहे. या स्पर्धेत नगरच्या खेळाडूंनी आपला उत्कृष्ट खेळ करत स्पर्धेत आघाडीवर आहेत. या स्पर्धेत पंच म्हणून प्रवीण ठाकरे जळगाव, पारुनाथ ढोकळे नगर, रशिद इनामदार पुणे , सतिश ठाकूर औरंगाबाद, पुष्कर डोंगरे औरंगाबाद हे काम पहात आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी यशवंत बापट, खजिनदार सुबोध ठोंबरे, विश्वस्त पारुनाथ ढोकळे, कार्तिक सर, देवेंद्र ढोकळे, चेतन कड, प्रकाश गुजराथी, संजय खडके, विद्याधर जगदाळे, दत्ता घाडगे, नवनीत कोठारी, डॉ. स्मिता वाघ, अनुराधा बापट, शुभदा ठोंबरे परिश्रम घेत आहेत.

Ahmednagar Chess: चांगला खेळाडू पुढे आला पाहिजे यासाठी नरेंद्र फिरोदिया नेहमी प्रयत्नशील : आमदार संग्राम जगताप

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: