Wednesday, September 27, 2023
HomeMUMBAIChina India News: चीनच्या नकाशात अरुणाचल प्रदेशचा समावेश

China India News: चीनच्या नकाशात अरुणाचल प्रदेशचा समावेश

China India News: मुंबई : चीनने नवा नकाशा प्रसिद्ध केले असून त्यात अरुणाचल प्रदेश, अक्साई चीन, दक्षिण तिबेट, तैवान आणि दक्षिण चीन समुद्राचा बहुतांश भाग यांचा समावेश केला आहे.

‘चीनच्या ‘स्टॅण्डर्ड मॅप सर्व्हिस’ या संकेतस्थळावर चीनच्या नैसर्गिक संसाधन खात्याकडून वर्ष २०२३ चे अधिकृत मानचित्र प्रकाशित करण्यात आले आहे’, अशी माहिती चीन सरकारचे मुखपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने ट्वीट करून दिली आहे.

‘हे नकाशा चीन आणि जगातील इतर देशांच्या सीमा रेखाटण्याच्या पद्धतीवर आधारित आहे’, असेही या ट्वीटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे याच वर्षी एप्रिल मासात चीनने अरुणाचल प्रदेशातील ११ गावांचे नामकरण केले होते. यावरून वाद झाला होता. अमेरिकेने भारताच्या बाजूने मत मांडले होते.

China includes Arunachal Pradesh, Aksai Chin in new ‘standard map’

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments