Monday, September 25, 2023
HomeAHMEDNAGARDatta Mandir: दत्त मंदिरात संकल्प महाआरती संपन्न

Datta Mandir: दत्त मंदिरात संकल्प महाआरती संपन्न

Datta Mandir: दत्त मंदिरात संकल्प महाआरती संपन्न

Datta Mandir: अहमदनगर (प्रतिनिधी): मधील चौपाटी कारंजा येथील पुरातन शिवप्रधान श्रीदत्त मंदिर संकल्प महाआरती उद्योजक व समाजसेवक अभिमन्यूजी राजूमामा जाधव व काजल जाधव,चौपाटी कारंजा मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष आशा व सुरेशजी महाले सौ.व श्री.स्वप्नील बोत्रे यांच्या हस्ते संपन्न झाली यावेळी चौपाटी कारंजा मित्र मंडळचे अध्यक्ष अमोल भंडारे,महेश कुलकर्णी पद्मा देशपांडे, ऍड पराग देशमुख, सौ.महाले,गणेश सुद्रिक, सागर रोहाकले आदींसह मोठ्या संख्नेने भाविक उपस्थित होते.

भंडारे यावेळी बोलताना म्हणाले हे दत्त मंदिर पुरातन असून येथील दत्त मूर्ती शिवप्रधान आहे हे या मंदिराचे वैशीष्ट्य आहे सर्वत्र दत्त मूर्ती हि ब्रम्हा विष्णू महेश असते पण येथे ब्रम्हा,महेश विष्णू आहे मध्यभागी शिव आहे म्हणून या मंदिराला वेगळे पण आहे. दत्तजयंती नंतर दर गुरुवारी चौपाटी कारंजा मित्र मंडळ च्या वतीने मान्यवरांच्या हस्ते महाआरती केली जाते जेणे करून अखंड भारत हि आमची संकल्पना आहे.

अभिमन्यू जाधव यावेळी बोलताना म्हणाले अशा महाआरती मुळे हिंदूवर चांगले संस्कार होतील, मुले अध्यात्माकडे लहान पनापासून वळतील व पाशात्य संस्कार न होता आपला धर्म त्यांना समजेल व हिंदू एक होईल,आपण आपल्या परंपरा जपल्या पाहिजे,आजचा युवक मोबाईल व मिरवणुकीत दिसतो तो अशा कार्यक्रमामुळे मंदीराकडे वळेल हिंदू धर्म संस्कार सर्वावर होतील.

ते पुढे म्हणाले शास्त्रांमध्ये आरतीला आरात्रिक अथवा नीराजन सुद्धा म्हटले गेले आहे.विज्ञान कित्येक वर्षांपासून आरतीचा महिमा,विधी,तिचे वैज्ञानिक महत्त्व वगैरेंविषयी सांगत आले आहेत,एवढेच नव्हे तर आपल्या सत्संग-समारंभांमध्ये सामूहिक आरतीद्वारे तिच्या लाभांचा प्रत्यक्ष अनुभवही करवित राहिले आहेत.आरतीमुळे एक प्रकारे वातावरणात शुद्धिकरण होते आपण आरती करतो तेव्हा तिच्यापासून आभा,ऊर्जा मिळते.हिंदू धर्माच्या ऋषींनी शुभप्रसंगी तसेच भगवंताची,संतांची आरती करण्याचा जो शोध घेतला आहे तो हानिकारक जीवाणूंना दूर ठेवतो, एकमेकांच्या मनोभावांचा समन्वय करतो असेही जाधव म्हणाले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments