Wednesday, September 27, 2023
HomeAHMEDNAGARDhangar Samaj: धनगर आरक्षणप्रश्नी आमदार प्रा.राम शिंदे यांनी संभाजीनगरमध्ये वेधले सरकारचे लक्ष

Dhangar Samaj: धनगर आरक्षणप्रश्नी आमदार प्रा.राम शिंदे यांनी संभाजीनगरमध्ये वेधले सरकारचे लक्ष

Dhangar Samaj: धनगर आरक्षणप्रश्नी आमदार प्रा.राम शिंदे यांनी संभाजीनगरमध्ये वेधले सरकारचे लक्ष

Dhangar Samaj: ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन लवकरच घेणार चोंडीतील उपोषणकर्त्यांची भेट !

Dhangar Samaj: जामखेड: धनगर आरक्षणप्रश्नी जामखेड तालुक्यातील चोंडी येथे यशवंत सेनेच्या वतीने आमरण उपोषणाचे अंदोलन सुरु आहे. या अंदोलनाच्या 11 व्या दिवशी मोठे यश आले आहे. आमदार प्रा राम शिंदे यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन धनगर समाजाच्या व्यथा आणि आरक्षणाच्या प्रश्नांवरून राज्य सरकारचे लक्ष वेधताच सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आमदार शिंदे यांच्या मागणीनंतर सरकारने चोंडीतील उपोषणकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची नेमणूक केली आहे, अशी माहिती आमदार प्रा.राम शिंदे यांनी दिली.

17 ते 22 सप्टेंबर 2023 या काळात संसदेच्या विशेष अधिवेशनात महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसुचीत जमाती (एस.टी. प्रवर्ग) आरक्षणासाठीचा वटहुकुम काढावा या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने श्रीक्षेत्र चोंडी येथे गेल्या 11 दिवसांपासून आमरण उपोषणाचे अंदोलन सुरु आहे. बाळासाहेब दोडतले, माणिकराव दांगडे, अण्णासाहेब रूपनवर व सुरेश बंडगर व इतर आमरण उपोषण करत आहेत.या उपोषणाला महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे.राज्यात ठिकठिकाणी अंदोलने होत आहेत.

राज्यभरातील धनगर बांधव चोंडीत दाखल होऊन उपोषणकर्त्यांची भेट घेऊन अंदोलनास पाठिंबा देत आहेत. उपोषणाच्या अंदोलनास दहा दिवस उलटूनही महाराष्ट्र सरकारकडून या अंदोलनाची दखल न घेतल्यामुळे राज्यातील धनगर समाजाचा सरकारविरोधात रोष वाढला आहे. याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. अश्यातच अंदोलनाच्या 11 व्या दिवशी एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. आमदार प्रा राम शिंदे यांच्या पाठपुराव्यानंतर सरकारने अंदोलकांशी चर्चा करण्यासाठी तातडीने पाऊले उचलली आहेत.

संसदेच्या विशेष अधिवेशनात महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसुचीत जमाती (एस.टी. प्रवर्ग) आरक्षणासाठीचा वटहुकुम काढावा या मागणीसाठी यशवंत सेनेच्या वतीने श्रीक्षेत्र चोंडी  येथे सुरु असलेल्या आमरण उपोषणाची दखल घेण्याबाबत आमदार प्रा राम शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची संभाजीनगर येथे भेट घेतली.

चोंडी येथे सुरु असलेल्या उपोषणाचं आणि धनगर समाजाच्या प्रश्नांचं गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने तातडीने सकारात्मक पाऊल उचलावीत म्हणून आमदार प्रा राम शिंदे यांनी सरकारकडे आग्रह धरला. यावेळी सरकारने उपोषणकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्री महाजन हे लवकरच चोंडी येथील उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. आमदार प्रा राम शिंदे यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे सरकार पातळीवर हालचाली वाढल्या आहेत. सरकार काय भूमिका घेणार याकडे राज्यातील धनगर समाजाचे लक्ष लागले आहे.

सरकार कोणतंही असो, पक्ष कोणताही असो, धनगर समाज सातत्यानं संयमाची शांततेची भूमिका घेऊन लोकशाही पध्दतीनं उपोषण करणं असेल, अंदोलन करणं असेल ही भूमिका पार पाडत आलेला आहे. गेल्या दहा दिवसांपासून चोंडीत उपोषण सुरू आहे. आमच्या प्रश्नाकडे शासन आणि प्रशासन लक्ष देत नाही ही धनगर समाजाची भावना झाली आहे. परंतू असं न होता, राज्य सरकारने तातडीने लक्ष दिलं पाहिजे, या दृष्टिकोनातून मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची छत्रपती संभाजीनगर येथे भेट घेतली. चोंडी येथे सुरु असलेल्या उपोषणाचं आणि धनगर समाजाच्या प्रश्नांचं गांभीर्य सरकारच्या निदर्शनास आणून दिले. सरकारने सकारात्मक पाऊल उचलले आहे. ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन हे लवकरच उपोषणकर्त्यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत, अशी माहिती आमदार प्रा.राम शिंदे यांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments