
Dr.Paulbudhe College | डॉ.पाउलबुधे महाविद्यालयात पंतप्रधान पोषण शक्ती योजने अंतर्गत पालकला स्पर्धा संपन्न
Dr.Paulbudhe College | अहमदनगर (प्रतिनिधी):
आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत वेळेअभावी प्रत्येकजण
आपल्या आहाराकडे दुर्लक्ष करुन फास्टफूडला महत्व देतात,
त्यामुळे आजाराला निमंत्रण मिळते. आयुष्यमान घटते.
दिर्घकाळ आयुष्य जगायचे असेल तर संतुलित आहार घ्या.
विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकासासाठी सात्विक आहार
गरजेचा आहे. या आहारामुळे तुमच्या जीवनात आजाराला
थारा मिळणार नाही. आहारात तृणधान्य वापर करा त्यामुळे
पचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकार क्षमता वाढते,
असे प्रतिपादन प्राचार्या डॉ.रेखाराणी खुराणा यांनी केले.
वसंत टेकडी येथे डॉ.ना.ज.पाउलबुधे माध्यमिक व
उच्च माध्यमिक विद्यालयात ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना’
कार्यक्रमांतर्गंत पाककला स्पर्धा संपन्न झाल्या.
यामध्ये पौष्टिक तृणधान्याचे महत्व माता-भगिनींनी रेसिपीमधून पटवून दिले.
याप्रसंगी प्राचार्या डॉ.रेखाराणी खुराणा, अनुराधा चव्हाण,
प्राचार्य भरत बिडवे, संदिप कांबळे, संयोजक आशा गावडे,
शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, माता-भगिनी उपस्थित होत्या.
यावेळी सर्व रेसिपीचे परिक्षण प्रा.जयश्री केदार,
प्रा.सविता वाळके यांनी केले. सहभागी 10 रेसिपी मधून
तीन क्रमांक काढून सुगरण गृहिणीला बक्षिसे देण्यात आली.
यामध्ये शुभांगी ढाकणे, जयश्री भुसारी,
जयश्री लोंढे यांना पेन, पर्स देऊन सन्मानित करण्यात आले.
राज्यात विविध उपक्रमांद्वारे तृणधान्याचे महत्व नागरिकांपर्यंत पोहचवण्यात येत आहे
प्रास्तविकात प्रा.वैशाली वाघुले म्हणाल्या, संयुक्त राष्ट्र संघाने 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष घोषित केले आहे. त्यामुळे राज्यात विविध उपक्रमांद्वारे तृणधान्याचे महत्व नागरिकांपर्यंत पोहचवण्यात येत आहे. आहाराचे महत्व पालकांना कळाले तर ते कुटूंबातील सर्वांना त्याचे अनुकरण करायला लावतात.
आरोग्य चांगले राहणे त्याकरिता आहार महत्वाचा
प्राचार्य भरत बिडवे म्हणाले, आरोग्य चांगले राहणे त्याकरिता आहार महत्वाचा आहे. सकस व संतुलित आहार विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण वाढीसाठी विकासासाठी गरजेचा असतो. मुलांच्या कार्यक्षमतेत व बुद्धीत देखील सकस आहाराने वाढ होते, त्यामुळे आहाराला महत्व द्या.
ऋतुप्रमाणे आहारात बदल आवश्यक
यावेळी प्रा. सुजाता दरे यांनी आहाराचे महत्व पटवून देतांना आहार तज्ञांचे दाखले देत रोजच्या आहारात काय खावे हे स्पष्ट करतानाच ऋतुप्रमाणे आहारात बदल आवश्यक आहे. रोज संतुलित आहार बनविणे शक्य नसते मग सात वारांची विभागणी करुन प्रत्येक दिवशी एक पोषकतत्व मुलांना देता येतील, असा आहार घेतला तर आरोग्य उत्तम राहील.
यावेळी प्राचार्या अनुराधा चव्हाण, प्राचार्य संदिप कांबळे यांनी देखील कडधान्य, पालेभाज्या शाकाहरी जेवणाचे महत्व, मासांहारी आहारामुळे होणारे तोटे यावेळी सांगितले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.क्रांती गायकवाड, प्रा.लक्ष्मण बेळगे व सर्व प्राध्यापिका यांनी परिश्रम घेतले.
या उपक्रमाचे आयोजन सौ.आशा गावडे यांनी नियोजनबद्ध करुन कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल प्राचार्य बिडवे यांनी कौतुक केले. सर्व मातांनी पौष्टिक रेसिपी तयार करुन स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अर्चना कर्डिले यांनी केले तर आभार प्रा.आशा गावडे यांनी मानले.