
Eye Camp: कौंडगांव येथील नेत्र तपासणीस उत्स्फुर्त प्रतिसाद
Eye Camp: नगर – नगर तालुक्यातील आदर्श कौडगाव येथे ग्रामस्थ व बुधराणी हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब धिवर, युवा सेना उपप्रमुख सोमनाथ कांडके, माया आल्हाट, लक्ष्मण धिवर, सुभेदार मेजर राजेंद्र खर्से, अण्णा थोरात, पोपट कांडके, गणेश काळे, सेंट्रल बँकेचे श्री.ठोंबरे, दीपक धीवर आदि उपस्थित होते.
संजय गांधी निराधार योजना समिती व ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब धिवर म्हणाले, ग्रामिण भागात आरोग्याचे प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होत असतात, परंतु आर्थिक परिस्थितीमुळे अनेकजण उपचार घेण्यास टाळाटाळ करतात. यासाठी मोफत शिबीराच्या माध्यमातून रुग्णांना दिलासा देण्याचे काम होत आहे. असे शिबीर नियमित राबविण्याचा आपला प्रयत्न राहील. त्याचप्रमाणे संजय गांधी, श्रावणबाळ या योजनेचा लाभ निराधार व्यक्तींनी पूर्ण कागदपत्राची पूर्तता करून या योजनेचा लाभ घ्यावा त्यासाठी मी सहकार्य करु, असे आवाहन केले.
त्यावेळी युवा सेना उपप्रमुख सोमनाथ कांडके म्हणाले की, आपल्या गावचे सामाजिक कार्यकर्ते आमचे सहकारी बाबासाहेब धिवर हे नेहमी असे सामाजिक उपक्रम राबवत असतात. या उपक्रमाचा अनेकांचा चांगला फायदा होत असतो. ते नि:स्वार्थी कार्य करत आहेत. त्यांच्या कार्यात आपण सर्वांनी सहकार्य केल्यास हे कार्य अधिक व्यापक होईल, असे सांगितले.
या शिबीरात कौडगाव व पंचक्रोशीतील नेत्र रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी 205 रुग्णंची नेत्र तपासणी करून त्यातील 45 रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी पुणे येथे पाठविण्यात आले. या उपक्रमाचे पंचक्रोशितून कौतुक होत आहे.