Darshak News
World Wide News
Eye Camp: मानव सेवेतून केलेले कार्य पुण्यकर्मच : अनिल कटके

Eye Camp: मानव सेवेतून केलेले कार्य पुण्यकर्मच : अनिल कटके

Eye Camp: मानव सेवेतून केलेले कार्य पुण्यकर्मच : अनिल कटके

Eye Camp: अहमदनगर (प्रतिनिधी)-गेल्या 28 वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे हे नागरदेवळे येथे छोट्याशा गावात मोतीबिंदू शिबिराचे आयोजन करतात.ही कौतुकास्पद बाब आहे.जगात उपलब्धता असतानाही सेवा कार्य करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही.परंतु जालिंदर बोरुडे हे दर महिन्याला दहा तारखेला शिबिराच्या आयोजन करतात. यामुळे अनेक वृद्धांसाठी ते प्रकाश देणारे आधारवड झाले आहेत.बोरुडे यांनी या मानव सेवेच्या कार्यातून केलेले कार्य पुण्य कर्मच आहे.सध्या अनेक ठिकाणी एक ते दोन लाख पगार असलेली मुले वृद्ध माता पितांना सांभाळायला तयार नाहीत.

यामुळे वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे.तर वृद्ध मातापित्यांच्या मोतीबिंदूच्या ऑपरेशन साठी खर्च करायचा नाही म्हणून अनेकांना अंधत्व आले आहे. या मोतीबिंदू शिबिराच्या माध्यमातून जालिंदर बोरूडे हे वृद्धांचे आधारवडच झाले आहेत.असे प्रतिपादन एलसीबी चे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी केले. नागरदेवळे येथे पुणे येथील के.के.आय बुधरानी हॉस्पिटल व फिनिक्स सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोतीबिंदू शिबिरात उस्फूर्त प्रतिसाद लाभला.

या शिबिराचे उद्घाटन एलसीबी चे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या हस्ते दीपक प्रज्वलनाने करण्यात आले.याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरूडे,विठ्ठल राहिंज,राजेंद्र बोरुडे, यशवंत गारदे,ओम बोरुडे,के.के.आय बुधराणी हॉस्पिटलचे प्रकल्प समन्वयक ए.एस.धर्माधिकारी, माया आल्हाट,मनीषा कोरडे आदी उपस्थित होते. जालिंदर बोरूडे म्हणाले,पैशा अभावी अनेक वृद्धांना मोतीबिंदू झाल्याने अंधत्व येते.

वयाच्या साठी नंतर मोतीबिंदूची समस्या घरोघरी आहे.म्हणून दर महिन्याला फिनिक्स सोशल फाउंडेशन मोतीबिंदू शिबिराचा उपक्रम राबवित आहे.ज्यांचे ऑपरेशन या शिबिरात झाले आहे.त्यांनी रुग्णांना या शिबिराची माहिती द्यावी. या मोतीबिंदू शिबिरात ३८८ रुग्णांची तपासणी करण्यात आली.तर 92 रूग्ण मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी के.के.आय बुधरानी हॉस्पिटल पुणे येथे पाठवण्यात आले.अल्प दरात 37 चष्मे वाटप करण्यात आले.या शिबिरास रुग्णांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: