
Hindi Diwas: डॉ.ना.ज.पाउलबुधे माध्य. व उच्च माध्य. विद्यालयात हिंदी दिन साजरा
Hindi Diwas: अहमदनगर (प्रतिनिधी) – आपल्या देशाला एकसंघ ठेवण्यात हिंदी भाषेचे मोलाचे योगदान आहे. स्वातंत्र्यपुर्व काळात प्रत्येक राज्यात, प्रांतात वेगवेगळ्या भाषा होत्या. इंग्रज राजवटी विरोधात सर्व लढा देत होते, या सर्व स्वातंत्र्य सेनानींना हिंदी भाषेने एकत्र आणण्याचे काम केले. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जगात हिंदी प्रचार आणि प्रसारास प्रोत्साहन दिले आहे. देशातील प्रत्येक भाषेची हिंदी भाषा ही बहिणच आहे.
विद्यार्थ्यांचे भविष्यातील क्षेत्र विस्तारत आहेत. तेव्हा हिंदी भाषेचा शिक्षणाबरोबरच व्यवहारातही उपयोग करावा. आज देशभर हिंदी भाषेचा प्रभाव वाढत आहे. तेव्हा जीवनात हिंदीला फार महत्व आहे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य काकासाहेब वाळूंजकर यांनी केले. वसंत टेकडी येथील डॉ.ना.ज.पाउलबुधे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात हिंदी दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य काकासाहेब वाळूंजकर, पुणतांबा हायस्कूलचे ग्रंथपाल श्री. पवार, श्रीकृष्ण इन्स्टिट्युटच्या संचालिका सौ.आशा चौरे, प्राचार्य भरत बिडवे आदि उपस्थित होते. याप्रसंगी प्राचार्य भरत बिडवे म्हणाले, प्रत्येक 40 मैलावर भाषा बदलली जाते, असे म्हटले जाते परंतु आपल्या देशातील कोणत्याही प्रांतात गेला की, हिंदीतून संवाद सर्वात सोपा होता.
त्यामुळे प्रत्येकाला हिंदी आली पाहिजे, समजली पाहिजे, असे सांगितले. हिंदी विषयाचे शिक्षक महेंद्र थिटे यांनी हिंदी भाषेचे महत्व सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य, गाणे, नाटिका, संवाद, भाषण, निबंध हिंदीतून सादर केले. यावेळी विद्यार्थींनी विविध प्रांतांच्या वेशभुषा करुन हिंदी भाषेचा जयघोष केला.
स्पर्धा संयोजन विष्णू मगर यांनी केले. यावेळी हिंदी विषयांच्या शिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्तविक दिपक परदेशी यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. आशा गावडे यांनी केले. शेवटी राजेंद्र मोरे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.सुजाता दरे, प्रा.वैशाली शेळके, प्रा.स्नेहल कारमपुरी, प्रा.लक्ष्मी खाडे, प्रा.वैशाली शिर्के, प्रा.सविता वाळके, प्रा.अर्चना येंगलदास, प्रा.यादव व शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले.