
Kapad Bazar Ahmednagar: मालक नंदकिशोर मोडालाल बायड (वय ५३) याला पोलिसांनी केली अटक
Kapad Bazar Ahmednagar: अहमदनगर : अहमदनगर शहराच्या बाजारपेठेतील मोची गल्ली भागात असलेल्या महावीर स्टोअर्स या दुकानातून पोलिसांनी सहा तलवारी जप्त केल्या. या तलवारी दुकानात विकण्यासाठी ठेवल्या होत्या, की अन्य उद्देशाने याचा तपास पोलिस करीत आहेत.

(Photo File News photo Img)
मालक नंदकिशोर मोडालाल बायड (वय ५३) याला पोलिसांनी अटक केली आहे.कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली.
टाकण्यात आलेल्या छाप्यामध्ये पोलिसांनी तब्बल ६ तलवारी जप्त केल्या असल्याची माहिती मिळाली आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी प्रतिष्ठित व नावाजलेल्या दुकानात पोलिसांनी छापा टाकल्याने एकच खळबळ उडाली आहे.