
Kanore School: अहमदनगर – कल्याण रोड, ड्रिमसिटी मागील श्री लक्ष्मीनारायण शिशु शिक्षण मंदिर संचलित संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेत शाडूच्या मातीपासून गणपती बनवा कार्यशाळेचे दि.15 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी ठीक 8 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. या कार्यशाळेत प्रसिद्ध कलाशिक्षक अशोकराव डोळसे हे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती शिक्षण समितीचे चेअरमन जितेंद्र लांडगे यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या कृतीला वाव, कल्पकता, निरीक्षण हया सर्व गोष्टींना चालना देण्यासाठी ही कार्यशाळा आयोजित केली आहे. पर्यावरणाची संकल्पना या उपक्रमातून जोपासली जाणार आहे. ही कार्यशाळा यशस्वीतेसाठी उपक्रमशील शिक्षक जगन्नाथ कांबळे, सुशिलकुमार आंधळे, राजेंद्र गर्जे, चंदा कार्ले, नम्रता ममडयाल, वैशाली केदारे, उज्ज्वला शिंदे, अनिता जपकर, विदया नरसाळे, श्वेता राऊत आदि परिश्रम घेत आहेत.
Kanore School: या शाळेत प्रत्येक सण उत्सव साजरे करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. बुध्दीला चालना दिली जाते. पालक विद्यार्थी सर्व सहभागी होत असल्याने आम्हालाही प्रोत्साहन मिळत असल्याचे शिक्षण समितीचे सचिव विक्रम पाठक यांनी सांगितले.
तसेच नगर शहरातील इ.8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनाही या कार्यशाळेत सहभागी होता येणार त्यासाठी 50 रु. शुल्क असणार आहे, अशी माहिती मुख्याध्यापिका कल्पना भामरे यांन दिली.