
Kanore School: अहमदनगर (प्रतिनिधी): कल्याण रोड, ड्रिमसिटी मागील श्री लक्ष्मीनारायण शिशु शिक्षण मंदिरच्या संस्कृती श्रीनिवास कनोरे प्रशालेत स्वातंत्र्य दिनानिमित्त दि.15 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 7.45 वा. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव न्यायाधिश श्रीमती भाग्यश्री पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे.
यावेळी विशेष सरकारी वकिल सुरेश लगड, अंबिका महिला बँकेचे चेअरमन अॅड. शारदाताई लगड, अॅड.आनंद सुर्यवंशी, अॅड.राजेश कावरे, शालेय शिक्षण समितीचे चेअरमन जितेंद्र लांडगे, सचिव विक्रम पाठक, खजिनदार संजय सागांवकर, विश्वस्त अरविंद धिरडे, गजेंद्र सोनवणे, कृष्णा बागडे आदिंसह संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
स्वातंत्र्य दिनानिमित्त मेरी मिट्टी, मेरा देश अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धा, वकृत्व, चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तसेच एलकेजी – युकेजीच्या विद्यार्थ्यांचा देशभक्तीपर गितांवर आधारित कार्यक्रम होणार आहे, अशी माहिती मुख्याध्यापिका कल्पना भामरे यांनी दिली.