Sunday, September 24, 2023
HomeAHMEDNAGARKerala Samaj: केरला समाजाच्यावतीने अहमदनगरमध्ये ओणम उत्सव संपन्न

Kerala Samaj: केरला समाजाच्यावतीने अहमदनगरमध्ये ओणम उत्सव संपन्न

Kerala Samaj: केरला समाजाच्यावतीने अहमदनगरमध्ये ओणम उत्सव संपन्न

Kerala Samaj: अहमदनगर (प्रतिनिधी): अहमदनगर केरला समाजच्या वतीने संजोग लॉन्स येथे ओणम उत्सवाचे आयोजन आज करण्यात आले होते त्याचे उदघाटन लेफ्टनंट कर्नल उन्नीकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी लेफ्टनंट कर्नल श्रीकांत,मनपा उपयुक्त श्री पठारे ,केरला समाजाचे अध्यक्ष बाबुशेठ टायरवाले,आनंदराव शेळके,ऐ एस कुरियन,वसंतसिंग,राजू लक्ष्मण,पी सुदर्शन,श्री सत्यम याच्यासह मोठ्या संखेने सहकुटुंब दाक्षिणात्य मंडळी उपस्थित होती.

केरळ मधील जे लोक उद्योग व्यवसायासाठी बाहेर पडले ते पूर्ण जगात स्थायिक झाले ते विवध धर्माचे असले तरी ओणम उत्सव एकत्र येउन साजरा करतात व परंपरा पाळतात.हि मंडळी नगरच्या संस्कृतीशी एकरूप झालेली आहे,सर्वाना मराठी बोलता येते व येथील सर्व उत्सवात त्याचा सहभाग असतो व विकासात पण त्याचे योगदान आहे दरवर्षी हा उत्सव नगरमध्ये साजरा केला जातो.

दिवाळी सारखा हा सन असून वामन अवतारातील बळीराजा/महाबलीच्या स्मरणार्थ हा उत्सव साजरा केला जातो.पातळात गेलेला बळीराजा प्रजेला भेटण्यासाठी या दहा दिवस पृथ्वीवर येतो त्याच्या स्वागतसाठी फुलाच्या रांगोळ्या काढल्या जातात.

संपूर्ण दिवसभर हा उत्सव चालला यामध्ये चित्रकला स्पर्धा,फुलाच्या रांगोळ्या स्पर्धा,१८ पदार्थाचे जेवण हे केळीच्या पानावर देण्यात आले तसेच नृत्य,ऑर्केस्ट्रा आदी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी सादर केले गेले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी दीप प्रज्वलन करण्यात आले.यावेळी पाहुण्याच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रम यशश्वीतेसाठी पदाधिकारीनी प्रयत्न केले यशश्वीतेसाठी पदाधिकारीनी प्रयत्न केले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments