
अहमदनगर (प्रतिनिधी) -छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य आणि स्वराज्यातील सुराज्य शासन आपल्याला सोपवले आहे त्याचे पालन ज्याप्रमाणे धर्मवीर संभाजी महाराजांनी केले प्राण्याचे बलिदान दिले परंतु धर्म परिवर्तन केले नाही परंतु आपण आज समाजात लव्ह जिहाद पहिले तर आपल्याला शरमेने मान खाली घालावी लागते यासाठी आपणच जबाबदार आहोत आपल्यावर झालेला पाश्चिमात्य संस्कृतीचा हा परिणाम आहे व आपणच आपले संस्कार विसरत चाललो आहोत असे प्रतिपादन सुनील महाराज तोडकर यांनी केले.
संत शिरोमणी सावता महाराज यांच्या 728 पुण्यतिथी निमित्त नागरदेवळे येथील संत शिरोमणी सावता महाराज मंदिर, समस्त ग्रामस्थ आयोजित अखंड हरिनाम सप्ताह निमित्त आयोजलेल्या कीर्तनात माळी महासंघ वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनील तोडकर महाराज बोलत होते हिंदू धर्म या विषयावर त्यानी किर्तन केले त्यानी हिंदू धर्म संस्कार, संस्कृती, इतिहास बाबत,युवा,युवती, महिलाना विशेष प्रबोधन केले.
ते पुढे म्हणाले आपण आपली हिंदू संस्कृतीचे आचरण करत नाही,आपण संतांचे चरित्र वाचन करत नाही, शिवाजी महाराज-संभाजी महाराजांचे चरित्र मुलांना सांगत नाही त्यासाठी सर्वांनी संत तसेच थोर पुरुष यांचे चरित्र वाचले पाहिजे. संस्कृतीचा परिणाम असा होतो की पहिले गुरुकुल पद्धती भारतामध्ये होती त्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्र यांनी देखील गुरु वशिष्ठ महाराज यांचे आश्रमात जाऊन संस्कार घेतले तसेच श्रीकृष्ण भगवान आणि देखील गुरु संदीप आणि यांच्याकडे जाऊन संस्काराचे धडे घेतले आज जर पाहिले तर आपण आपल्या मुलांना संस्काराचे धडे देतो का याचा प्रत्येकाने विचार करावा
किर्तनास नागरदेवळे पंचक्रोशितील ग्रामस्थाचा उत्सुफुर्त प्रतिसाद मिळाला संतपुजा मोहन धाडगे हरिओम सप्लार्य,गोकुळ धाडगे,संतोष धाडगे,गिलचे परिवार यांनी केली ,यावेळी पगंतसेवा पंचायत समिती सदस्य राहुल पानसरे यांनी केली, यावेळी सरपंच राम पानमळकर(धाडगे),बेलेश्र्वर कट्राकशनचे संचालक महेशभाऊ झोडगे,माळी महासंघचे कर्मचारी आघाडी दक्षिण जिल्हध्यक्ष नंदकुमार नेमाने,जिल्हा उपाध्यक्ष तुषार फुलारी, भिगांर शहर अध्यक्ष संदीपभाऊ दळवी,शहर अध्यक्ष नितीनभाऊ डागवाले,कर्मचारी शहर कार्यध्यक्ष गणेश धाडगे वतीने पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला,कीर्तनात नेहरू या केंद्राचे एड महेश शिंदे,छावा संघटनेचे अध्यक्ष रावसाहेब काळे,एड दिनकर कराळे,महाराष्ट्र राज्य वारकरी संघाचे उपाध्यक्ष विजय भालसिंग, नगर शहर वारकरी संघाचे कार्याध्यक्ष महेश कांबळे आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने भाविक, ग्रामस्थ उपस्थित होते