

अहमदनगर (प्रतिनिधी) नगर-जवळील दौंड रोडवर असलेली अवतार मेहेरबाबाची धुनी सूर्यास्ताच्या दरम्यान देशातील व परदेशातील विविध भागातील ८ मेहेरप्रेमींच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली यावेळी जाल दस्तूर,मेहेरनाथ कलचुरी,रमेश जंगले,अॅलन वॅग्नर,प्रसाद राजू,गोपी काला यांच्यासह विश्वस्त स्थानिक व देश विदेशातील हजारो मेहेरप्रेमींची उपस्थित होते यावेळी धुनीत आपले विकार टाकण्यासाठी व धुनीच्या दर्शनासाठी रांग लागली होती सुरवातीला विविध ठिकाणावरून आलेल्या भाविकांनी भजने म्हटली व नंतर धुनी पेटवण्यात आली यावेळी अनेक मेहेरप्रेमींनी प्रसाद वाटप केले
मेहेरबाबांनी 10 नोव्हेंबर, 1925 प्रथम पावसासाठी धुनी प्रज्वलित केली होती काही गावकरी पाऊस नसल्याने पिके धोक्यात आले आहेत या गंभीर दुष्काळ बद्दल ग्रामस्थांनी मेहेरबाबाशी संपर्क साधला तेव्हा त्यानी धुनी पेटवली त्याच्या नंतर काही मिनिटातच, पाऊस पडण्यास सुरुवात झाली.मेहेरबाबा त्याचे शिष्य धुनीत चंदन लाकूड टाकत असत आजही तीच परंपरा चालू आहे
मेहेर बाबांच्या आदेशानुसार,धुनी लोअर मेहेराबाद येथे सूर्यास्ताच्या वेळी प्रत्येक महिन्याच्या 12 तारखेला पेटवली जाऊ लागली ती आजतागायत तेवणे सुरू
आहे अवतार मेहेरबाबा यांचा जन्म २५ फेब्रुवारी १८९४ रोजी पुण्यात ससुन हॉस्पिटल मध्ये झाला.आपल्या आयुष्याच्या ७५ वर्षांच्या काळात ते सतत कार्यरत होते. इ .स. १९११ १९१२ च्या
सुमारास डेक्कन कॉलेजात शिक्षण घेत असताना त्यांनी विश्वबंधू संघाची स्थापना केली होती. हजरत बाबाजान ,सदगुरू नारायणमहाराज, हजरत ताजुद्दिन बाबा, साईनाथ महाराज व उपासनी
महाराज हे मेहेरबाबांचे पाचगुरु होय . उपासनीमहाराजांच्या आज्ञेनुसार, बाबा स्वतंत्रपणे कार्य करण्यास सिद्ध झाल्यावर, हळूहळू त्यांच्या भोवती शिष्य सहकारी जमू लागले. मेहेरबाबा या नावाचा अर्थ आहे कृपासिंधू पिता हे नामाभिधान त्यांच्या त्या अनुयायांनी त्यांना बहाल केले होते.
अरणगाव येथे त्यांनी आश्रम उभारला .त्यास मेहराबाद असे म्हणतात अरणगावच्या दलित वस्तीत त्यांनी शाळा चालवली, दवाखाना व इस्पितळ सुरू केले, या ठिकाणी कुष्ठरोग्यांना ते स्वतः आंघोळ घालत ,रोग्यांचे मलमुत्र व कपडे ते स्वतः स्वच्छ करत.,गावकरी बांधवांचे प्रबोधन व्हावे व त्यांच्यात चांगल्या चालीरीती रूजाव्यात म्हणून बाबा त्यांना हितोपदेश करत ते अरणगावच्या बांधवांच्या घरी जात.
१९५१ मध्ये हैद्राबाद ते मेहेराझाद (माळवी, पिंपळगाव, अहमदनगर ) अशी ४० दिवस पदयात्राही त्यांनी केली होती. पदयात्रेच्या शेवटी त्यांनी मेहेराझाद मधील टेंबी टेकडीवर १० दिवस
एकांतवास करून मनोनाशा चे कार्य केले व अखेर धुनी पेटवून त्यांनी या कार्याची फलश्रुती केली.त्यावेळी ते म्हणाले हेाते,जगातील सर्व धर्मांमधील कर्मकांड,विधिसमारंभ इत्यादी हे सर्व अनिष्ट
प्रथा या ज्वालेत जळून खाक झाल्या आहे, ईश्वर सर्वव्यापी आहे. मन जेव्हा इच्छा, वासना, आकांक्षारहित ईश्वरीप्रेमाच्या अग्निकुंडात भस्म होते, तेव्हाच असिम व अविनाशी परमात्मा प्रकट
होतेा.