
MP News: भोपाळ : आजारी किंवा बिमारू राज्य अशी मध्यप्रदेशची ओळख होती पण ही ओळख भारतीय जनता पक्षाच्या सरकारने बदलली आहे असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला आहे. त्यांनी आज मध्य प्रदेश सरकारचे 2003-2023 कालावधीचे ‘रिपोर्ट कार्ड’ जारी केले.
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, भाजप प्रदेशाध्यक्ष व्हीडी शर्मा आणि राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात शाह यांनी सरकारच्या कामाचा आढावा घेणारे रिपोर्ट कार्ड प्रकाशित केले.

मध्य प्रदेश हे राज्य 1956 मध्ये अस्तित्वात आले आणि तेव्हापासून, पाच-सहा वर्षे वगळता, 2003 पर्यंत कॉंग्रेसने राज्यावर राज्य केले, परंतु त्यांच्या राजवटीत राज्य बिमारू राहिले,असे शहा म्हणाले. मात्र, भाजप सरकारने विविध कल्याणकारी योजना राबवून राज्याला बिमारू टॅगमधून यशस्वीपणे बाहेर काढले आणि विकासाच्या मार्गावर आणले, असे ते म्हणाले.
कॉंग्रेसने जवळपास 53 वर्षांपासून राज्यात सत्ता गाजवल्याने त्यांनी आता त्यांच्या कामाचे रिपोर्ट कार्ड द्यावे असे आव्हान अमित शहा यांनी दिले. मध्यप्रदेश आता विकसित राज्यामध्ये गणले जाणारे राज्य बनले आहे असा दावाहीं त्यांनी केला.
कॉंग्रेसच्या राजवटीत वीज, पाणी, रस्ते या सर्वच आघाड्यांवर राज्य पिछाडीवर होते, मात्र भाजप सरकारने या सर्वच क्षेत्रात कमालीची उंची गाठली आहे