Monday, September 25, 2023
HomeAHMEDNAGARMuharram 2023: मोहरम एकात्मकतेचे प्रतीक : किरण काळे

Muharram 2023: मोहरम एकात्मकतेचे प्रतीक : किरण काळे

Muharram 2023: मोहरम एकात्मकतेचे प्रतीक : किरण काळे

Muharram 2023: बारा इमाम कोटलाला पिरशहा खुंट यंग पार्टीच्या वतीने चादर अर्पण

Muharram 2023: अहमदनगर (प्रतिनिधी): मोहरम निमित्त बारा इमाम कोटला या ठिकाणी पिरशहा खुंट यंग पार्टीच्या वतीने

शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे व पिरशहा खुंट यंग पार्टीचे अध्यक्ष तथा काँग्रेस शहर जिल्हा उपाध्यक्ष अलतमश जरिवाला

यांच्या हस्ते चादर चढवत अभिवादन करण्यात आले.

मोहरम हे एकात्मिकतेचे प्रतीक असून जातीय सलोख्याची भावना त्यानिमित्तानं सर्व धर्मीयांमध्ये असते, असे प्रतिपादन यावेळी बोलताना काळे यांनी केले.

यावेळी नालसाहब सवारी ट्रस्टचे प्रमुख सलीमभाई जरीवाला, अल्पसंख्यांक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला,

ओबीसी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, केडगाव विभागप्रमुख विलास उबाळे, ज्येष्ठ नेते सुनील क्षेत्रे,

ॲड. अश्रफ शेख, शहर जिल्हा सरचिटणीस अभिनय गायकवाड, इंजि. सुजित क्षेत्रे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष आकाश आल्हाट युवक सरचिटणीस आनंद जवंजाळ,

सामाजिक न्याय युवा विभाग शहर जिल्हाध्यक्ष प्रणव मकासरे, समीर सय्यद, असलम बागवान,

जब्बार मोमिन, हाजी रियाज़ तांबोळी, फरहान खान, रहीम शेख, नदीम बागवान, शहबाज कुरैशी,

आवेज़ शेख, मोईन कुरैशी, तौसीफ़ पटेल, मुजीब मंसूरी, आफताब शेख,

समीर मुन्शी, सज्जाद कुरैशी, तौसिफ मंसूरी, मुन्तज़िर खान, फज़ल कराचीवाला, वसीम शेख,

अरबाज़ बागवान, अज़र बागवान आदींसह पक्षाचे पदाधिकारी, पिरशहा खुंट यंग पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशाला हिंदू, मुस्लिम एकतेची अनेक वर्षांची परंपरा

यावेळी बोलताना किरण काळे म्हणाले की, भारताचे संविधान हे धर्मनिरपेक्ष संविधान आहे.

देशाला हिंदू, मुस्लिम एकतेची अनेक वर्षांची परंपरा आहे. धर्माधर्मामधील भाईचारा हा सामाजिक सलोख्यासाठी महत्त्वाचा आहे. मोहरमच्या निमित्तानं नगर शहरामध्ये हिंदू,

मुस्लिम एकतेचे दर्शन गेल्या अनेक वर्षांपासून या घडत आले आहे. पोलीस प्रशासनाने चोख

बंदोबस्त या निमित्ताने शहरामध्ये ठेवला आहे. सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.

सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन यावेळी काळे यांनी केले.

अलतमश जरीवाला म्हणाले की, नगरची मोहरम ही भारतभर ओळखली जाते.

भाविकांची मोठी श्रद्धा या ठिकाणी पाहायला मिळते. दरवर्षी पिरशहा खुंट यंग

पार्टीच्यावतीने चादर अर्पण केली जाते. अनिस चुडीवाला म्हणाले की,

दर वर्षी मोहरमच्या निमित्ताने सर्वधर्मीय भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी येथे होत असते.

शहरासह राज्याच्या विविध भागातून भाविक या ठिकाणी मनोभावे भेट देत असतात. नगरसाठी ही अभिमानाची बाब आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments