
NEET2023: अहमदनगर – येथील शेख कामिल अहमद इम्रान हा नुकत्याच 7 मे रोजी घेण्यात आलेल्या नीट-23 च्या परीक्षेत 99.19 percentile व 720 पैकी 625 गुण घेऊन वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र झाला. तो पुणे बोर्डाच्या मार्च 23 च्या विज्ञान विभागाच्या 12 वी च्या परीक्षेत कॉलेजमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता. त्याला 83.17 टक्के गुण मिळाले.
व बी ग्रुपला 86.33 टक्के गुण मिळाले होते. कामिल अहमद शेख हा शाळेतसुध्दा हुशार असून त्याला 10 वी च्या सीबीएससी बोर्डाच्या परीक्षेत 93 टक्के गुण मिळाले होते.
मुकुंदनगर येथील सीआयव्ही कॉलनी येथील शेख इम्रान इस्माइल यांचा तो चिरंजीव व श्रीरामपूर येथील शरदचंन्द्रजी पवार होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. रिजवान अहमद इस्माइल, ईश् हॉस्पीटल गोविंदपुरा येथील स्त्री रोग तज्ञ डॉ. रेश्मा रिजवान अहमद, इंजि. कामरान अहमद व अहमदनगर जिल्हा परिषदेतील वरिष्ठ लेखा सहायक तौसिफ अहमद यांचा तो पुतण्या आहे.
त्याच्या यशात जे जे सायन्स ऍकॅडमीचे कृष्णकांत झा, योगेश जहागीरदार, सौ. दीपा मंत्री, कमलकांत झा, निकिता मॅडम व गोविंद सर यांचे मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल माजी आ. डॉ. सुधीर तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, आ. सत्यजित तांबे, सुभाष गुंदेचा, शिवा ट्रस्ट औरंगाबादचे डॉ. बाळासाहेब पवार, साईदीप हॉस्पिटलचे डॉ. आर. आर. धूत, अनभुले फाउंडेशनचे डॉ. भूषण अनभुले, माजी विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकारी रफिक मुन्शी, नगरसेवक आसिफ सुलतान व कर्मयोगी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शफी जहागीरदार यांनी अभिनंदन केले.
काँग्रेसचे माजी नगरसेवक फय्याज केबलवाला,इंजिनियर अनिसभाई,कासम केबलवाला, इकबाल शेख,जावेद तांबोळी,जावेद मास्टर,आबिद खान,आदिल शेख,तन्वीर चष्मावाला आदींनी कामिलला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
नुकतेच माजी समाज कल्याण अधिकारी रफिक मुन्शी यांनी १२ वी बोर्ड परीक्षेच्या यशाबद्दल सत्कार केले
श्रीरामपूर येथील शरदचन्द्रजी पवार होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. Rizwan Ismail व ईश् हॉस्पीटल गोविन्दपुरा येथील स्रीरोग तज्ञ डॉ. रेश्मा रिजवान अहमद यांची कन्या रोझीना हिने दहावीत 91 टक्के आणि त्यांचे पुतणे कामील अहमद याने बारावीत 83 टक्के गुण प्राप्त केले आहेत. एकाच कुटुंबातील दोन्ही मुलं व त्यांच्या पालकांचं सत्कार माजी समाज कल्याण अधिकारी Rafique Munshi यांनी केले.