Sunday, September 24, 2023
HomeAHMEDNAGARNivedan: मयत अंकुश चत्तरच्या कुटुंबियांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची घेतली भेट

Nivedan: मयत अंकुश चत्तरच्या कुटुंबियांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची घेतली भेट

Nivedan: मयत अंकुश चत्तरच्या कुटुंबियांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची घेतली भेट

Nivedan: सदरचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी

Nivedan: अहमदनगर (प्रतिनिधी) : अहमदनगर शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी अंकुश चत्तर यांच्या खून प्रकरणी त्यांचे मेव्हुणे बाळासाहेब सोमवंशी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली व सदरचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांच्या नियुक्ती करावी तसेच आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची निवेदनातून मागणी केली. यावेळी आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अभिजित खोसे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

बाळासाहेब सोमवंशी यांनी निवेदनात म्हंटले की, माझे मेहुणे कै. अंकुश चत्तर यांची दिनांक १५/०७/२०२३ रोजी सायंकाळी १०.३० वा. सुमारास काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी जबर मारहाण केली होती. त्यानंतर माझे मेहुणे यांना अहमदनगर येथील मॅक केअर हॉस्पिटल येथे औषध उपचार करण्याकरिता लगेचच दाखल केले होते. परंतु माझ्या मेहुण्याला सदरच्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी इतके जबर मारले होते की, माझ्या मेहुण्याचे औषध उपचार चालू असताना दिनांक १७/०७/२०२३ रोजी पाहाटेच्या सुमारास निधन झाले.

माझ्या मेहुण्याची हत्याच करायची होती व त्याच उद्देशाने ते त्यांना मारहाण करीत होते

त्याबाबत तोफखाना पोलीस स्टेशन येथे दिनांक १६/०७/२०२३ रोजी पाहाटे ५.०० वा. सुमारास सदर आरोपी विरुध्द तोफखाना पोलीस स्टेशन येथे गु.र.१०३०/२३ भादविक ३०७, ३२५, ३२४, ३२५, ३२६, १४३, १४७, १४८, १४९, १०८ सह आर्म अॅक्ट ३/२५ म.पो. का.क. ३७(१)(३)/१३५, क्रि.लॉ. अॅ. अ. ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. जखमी माझे मेहुणे कै.अंकुश चत्तर हे उपचारा दरम्यान मयत झाल्याने ३०२ हे वाढीव कलम लावण्यात आले आहे. सदरची घटना ही इतकी क्रूर आणि भयभित करणारी होती. त्यामुळे माझ्या मेहुण्याला जेव्हा मारहाण चालली होती त्यावेळी हे गुंड प्रवृत्तीचे लोक जोरजोरात आरडाओरड करत होते व माझ्या मेहुण्याच्या बचावासाठी जे जवळ येत होते त्यांनाही ते मारहाण करत होते. यावरुन त्यांना माझ्या मेहुण्याची हत्याच करायची होती व त्याच उद्देशाने ते त्यांना मारहाण करीत होते, हे सिध्द होते.

सदरचे गुंड प्रवृत्तीचे लोक हे राजकीय व आर्थिकदृष्ट्या बलाढ्य

सदरचे गुंड प्रवृत्तीचे लोक हे राजकीय व आर्थिकदृष्ट्या बलाढ्य असून ते पैशाच्या जोरावर काहीही करु शकतात. याबाबत आम्हाला माहिती आहे. त्यामुळे आता माझ्या मेहुण्याच्या कुटुंबियांमध्ये भितिदायक वातावरण निर्माण झाले आहे. आम्हाला आता न्याय मिळण्याकरिता न्याय व्यवस्था सोडली तर दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही. परंतु सदरचे गुंड लोक हे सराईत गुन्हेगार असून त्यांना कायद्याच्या पळवाटा चांगल्याच माहिती असून या आधीही त्यांच्यावर बरेच गुन्हे दाखल असून त्यामधूनही ते सही सलामत सुटत आले आहेत.

ताकदीचा गैरवापर करुन सदरच्या गुन्ह्यातून सुटू शकतात

त्यामुळे यावेळी ही ते त्यांच्या ताकदीचा गैरवापर करुन सदरच्या गुन्ह्यातून सुटू शकतात, अशी आम्हाला भिती आहे. त्यानंतर ते माझ्या मेहुण्यासारखेच माझ्या मेहुण्याच्या कुटुंबियांचे आयुष्य संपवू शकतात, याची आम्हाला भीती वाटते. तरी आम्हाला अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून भविष्यात संरक्षण मिळावे याकरिता सदरचा गुन्हा हा जेव्हा न्यायालयात न्याय मागण्यासाठी चालू होईल त्यावेळी सरकारी पक्षाची बाजू भक्कम व निपक्षपातीपणे मांडण्याकरिता विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती होणे गरजेचे आहे. न्याय व्यवस्थेकडून न्याय मिळवण्याकरिता आम्हाला वकील उज्वल निकम यांच्यावर विश्वास असल्याने त्यांची या गुन्ह्यामध्ये सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी,अशी आम्ही आपणास विनंती करीत आहोत.

न्याय मिळवण्याकरिता आमच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात यावा

सदरच्या गुन्ह्यातील आरोपी हे इतके सराईत व राजकीयदृष्ट्या भक्कम आहेत.त्यामुळे माझ्या मेहुण्याच्या कुंटुंबियांना ही त्यांच्यापासून भविष्यात धोका आहे. तरी ही माझ्या मेहुण्याला न्याय मिळवण्याकरिता आमच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्यात यावा, त्यातील मुख्य आरोपी स्वप्निल शिंदे त्याचप्रमाणे आरोपी अभिजीत बुलाख ,
सुरज कांबळे हे सराईत गुन्हेगार असून या आरोपींवर विविध पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गंभीर गुन्हे दाखल आहेत.तरी आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments