Wednesday, September 27, 2023
HomeMAHARASHTRANSFDC Loan: एन.एस.एफ.डी.सी. कर्जासाठी अर्ज केलेल्यांना मुंबई शहर व उपनगर कार्यालयात संपर्काचे...

NSFDC Loan: एन.एस.एफ.डी.सी. कर्जासाठी अर्ज केलेल्यांना मुंबई शहर व उपनगर कार्यालयात संपर्काचे आवाहन

NSFDC Loan: कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक आरती पुराणिक यांनी केले

NSFDC Loan: मुंबई, : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजातील व्यक्तींचा शैक्षणिक,आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी जिल्हा कार्यालयामार्फत एन.एस.एफ.डी.सी. मुदती कर्ज योजना,

महिला समृद्धी योजना, लघु ॠण योजनेअंतर्गत कर्ज प्रस्ताव मागविण्यात आले होते. ज्या अर्जदारांनी जिल्हा कार्यालय, मुंबई शहर व मुंबई उपनगर येथे अर्ज दाखल केले होते, त्यांनी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक आरती पुराणिक यांनी केले आहे.

एन.एस.एफ.डी.सी., नवी दिल्ली यांच्याकडून कर्ज प्रस्तावासाठी निधी प्राप्त झालेला आहे. ज्या अर्जदारांनी अर्ज केले होते, त्यांच्या कर्ज प्रस्तावातील त्रुटींच्या कागदपत्रांची पूर्तता करुन घेऊन कर्जाचे वितरण करावयाचे आहे. तरी सर्व अर्जदारांनी तत्काळ संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय, गव्हर्नमेंट लेदर वर्किंग स्कूल कम्पाऊंड, खेरवाडी वांद्रे (पूर्व) मुंबई-४०००५१ या कार्यालयाशी संपर्क साधावा.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments