Monday, October 2, 2023
HomeAHMEDNAGAROBC: समाजाच्या प्रश्नांसाठी पदाचा उपयोग करावा : माऊली गायकवाड

OBC: समाजाच्या प्रश्नांसाठी पदाचा उपयोग करावा : माऊली गायकवाड

OBC: समाजाच्या प्रश्नांसाठी पदाचा उपयोग करावा : माऊली गायकवाड

OBC: महाराष्ट्र प्रदेश बारा बलुतेदार महासंघाची नवीन कार्यकारिणी जाहीर

OBC: अहमदनगर (प्रतिनिधी): केवळ दहा-बारा लोक एकत्र येऊन संघटन होत नसते. शेकडो कार्यकर्ते एक दिलाने,

मनाने समाजाच्या प्रश्नांसाठी लढतात. तेव्हा ती खरी संघटना असते.नगर जिल्ह्यात बारा बलुतेदार

महासंघाची ताकद वाढली आहे. नवीन नियुक्त झालेल्या पदाधिकार्‍यांनी आपल्या समाजावर होणार्‍या

अन्याया विरुद्ध तसेच इतर प्रश्नांसाठी पदाचा उपयोग करावा, असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष माऊली मामा गायकवाड यांनी केले.

महाराष्ट्र प्रदेश बारा बलुतेदार महासंघाची नवीन कार्यकारिणी जाहीर करुन नियुक्तीचे पत्र श्री.गायकवाड यांच्या हस्ते देण्यात आली.

याप्रसंगी नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, उपाध्यक्ष अनिल निकम, बारा बलुतेदार महासंघाचे शहराध्यक्ष शैलेश धोकटे,

महिला शहराध्यक्ष रोहिणी बनकर, जिल्हा संघटक ज्ञानेश्वर कविटकर, मार्गदर्शक मच्छिंद्र बनकर, शहर सचिव सुरेश चुटके,

आदिनाथ गायकवाड, मल्हारी गिते, संदिप घुले, सागर नांदुरकर, राजू ढवण, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

या नवीन कार्यकारिणीत जिल्हा कार्याध्यक्ष अनिल इवळे, सरचिटणीस श्रीकांत मांढरे,

जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब कोल्हे, शहर युवा अध्यक्ष संजय आरेशोतक, उपाध्यक्ष विष्णूपंत पाबळे,

शहर संघटक बाळासाहेब इवळे यांची नियुक्ती करण्यात आली.

OBC: सर्व कार्यकर्ते समाजातील प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो.

कार्याध्यक्ष अनिल इवळे म्हणाले, आम्ही सर्व कार्यकर्ते समाजातील प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो.

प्रांतअध्यक्ष कल्याणराव दळे, जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बारा बलुतेदार

महासंघात काम करताना विविध प्रश्नांना न्याय देण्याबरोबरच कोणत्याही समाजातील व्यक्तींवर अन्याय झाला तरी त्यांच्या सोबत जाऊन न्याय देण्यासाठी एकत्रित लढा देतो. न्याय मिळाल्याशिवाय गप्प बसत नाही, अशी आमची भुमिका असते. यावेळी श्रीकांत मांढरे, भाऊसाहेब कोल्हे यांनी आपली मनोगते व्यक्त करतांना महासंघाच्या माध्यमातून ज्वलंत प्रश्नांचा पाठपुरावा करुन समाजहितसाठी काम करु, असा विश्वास व्यक्त केला.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments