Darshak News
World Wide News
Music School : ‘भक्तीरंग’ संगीत रजनीमध्ये रसिक मंत्रमुग्ध

Music School : ‘भक्तीरंग’ संगीत रजनीमध्ये रसिक मंत्रमुग्ध

 Music School : अहमदनगर ( दि १८ जुलै २०२२) येथील श्री गणेश संगीत विद्यालयाच्यावतीने विद्यालयाच्या 33 व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून सावेडी येथील माऊली सभागृहात संपन्न झालेल्या ‘भक्तीरंग’ संगीत रजनीमध्ये नगरकर रसिक मंत्रमुग्ध झाली.             यात सिनेपार्श्वगायक मंगेश बोरगावकर यांनी ‘सुंदर ते ध्यान…’, अवघे गर्जे पंढरपूर.. कानडा राजापंढरीचा अशा एकाहून एक सरस भक्तीगिते सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयातील सुमारे 21 विद्यार्थ्यांनी तडफदार समुह तबाल वादन सादर केले. त्यात त्यांनी उठान, पेशकार, कायदा, रेला, चक्रदार इ. प्रकारचे सादरीकरण केले. लातूरहून आलेल्या बालगायक अथर्व व अद्वैत भोसले याने सुरुवातीला पुरिया धनाश्री रागातील छोटा ख्याल ‘पायलीया झनकार’ व नंतर ‘येई गा तू मायबापा पंढरीच्या राया’ हे भक्तीगीत सादर करुन रसिकांची वाऽह वाह मिळवली.             कार्यक्रमाच्या शेवटी बनारस घराण्याचे प्रसिद्ध तबलावादक तालमणी डॉ.राम बोरगांवकर व गणेश बोरगांवकर यांनी शुद्ध बनारस बाजात आपले बहारदार वादन सादर करुन रसिकांची मने जिंकली. या सर्वांना विद्यालयाचे संचालक राजेंद्र भोसले, सौरभ कणसे, कल्याण मुरकुटे, अनिल डोळे, अजय पिंपळे यांनी साथ संगत केली.             कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.राम बोरगावकर, विवेक धर्म, प्रा.बबन कराळे उपस्थित होते. सूत्रसंचालन बथुवेल हिवाळे यांनी केले तर प्रस्तावना मंजुषा शिवगुंडे यांनी केली. शेवटी संदिप नांगरे यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुशिल क्षत्रिय, डॉ.अरुण राऊत, संजय हिंगणे, श्रीशैल शिवगुंडे, प्रदीप गारडे, ओंकार कवडे, श्रीराज फटांगरे आदिंनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास नगरकर रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Vasant Tekdi : साईबाबांच्या आशिर्वादाने प्रभागाच्या विकासाबरोबरच मंदिर परिसराचा कायापालट-गणेश भोसले

Vasant Tekdi : साईबाबांच्या आशिर्वादाने प्रभागाच्या विकासाबरोबरच मंदिर परिसराचा कायापालट- गणेश भोसले

 Vasant Tekdi : अहमदनगर दि १८ जुलै २०२२ – सामाजिक कार्याला अध्यात्मिक जोड मिळाली- चांगले काम करण्याची प्रबळ इच्छशक्ती असल्याने साई-बाबांनी भरभरुन आशिर्वाद दिला. त्यामुळेच प्रभागाच्या विकासाबरोबरच धार्मिक कामात चांगले काम करतांना वसंत टेकडी येथील साईंबाबांचे मंदिर  नावारुपाला आले आहे. या मंदिराची महती दिवसेंदिवस वाढत असल्याचे ऐकून होतो. आज प्रत्यक्षात भेट दिल्यानंतर परिसराचा विकास पाहुन …

Vasant Tekdi : साईबाबांच्या आशिर्वादाने प्रभागाच्या विकासाबरोबरच मंदिर परिसराचा कायापालट- गणेश भोसले Read More »

GuruPurnima : डॉ.पाउलबुधे विद्यालयात गुरुपौर्णिमेला वह्यांचे वाटप

GuruPurnima : डॉ.पाउलबुधे विद्यालयात गुरुपौर्णिमेला वह्यांचे वाटप

GuruPurnima : शिक्षणाची सुरुवातच ‘शिक्षक’ घटकामुळे होते – बरबडे     GuruPurnima :  अहमदनगर (दि १७ जुलै २०२२) प्रतिनिधी – गुरुपौर्णिमा हा दिवस गुरुंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा असतो. केवळ या दिवशीच नव्हे तर रोजच आपल्या मनात गुरुंविषयी आदर, सन्मानाचा भाव असला पाहिजे. शिक्षण माणसाला आत्मभानं, जगण्याचा दृष्टीकोन देत असते. शिक्षणाची सुरुवातच ‘शिक्षक’ या घटकामुळे होते. आपल्या अपूर्णाला …

GuruPurnima : डॉ.पाउलबुधे विद्यालयात गुरुपौर्णिमेला वह्यांचे वाटप Read More »

AIYF : डॉ.आंबेडकरांनी दहन केलेल्या मनुस्मृतीचे विद्यापीठ अभ्यासक्रमात समावेशाचा निषेध

AIYF : डॉ.आंबेडकरांनी दहन केलेल्या मनुस्मृतीचे विद्यापीठ अभ्यासक्रमात समावेशाचा निषेध

AIYF : *घटनाकार विश्वरत्न डॉ. आंबेडकरांनी जाहीर दहन केलेल्या मनुस्मृतीचे य.च.म.मुक्त विद्यापीठ अभ्यासक्रमात समावेश, उदात्तीकरण तसेच छत्रपती शिवाजी महाराज व रामदास गोसावी यांचा संबंधी खोडसाळ प्रकरणाविरोधात एआयवायएफ, एआयएसएफ च्यावतीने निषेध !* AIYF : अहमदनगर (प्रतिनिधी) नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील अभ्यासक्रमात भारतीय संविधानविरोधी असलेल्या मनुस्मृतीचा केलेला मुक्त समावेश. मनुस्मृतीचे उदात्तीकरण करणारे सातत्याने विचारले …

AIYF : डॉ.आंबेडकरांनी दहन केलेल्या मनुस्मृतीचे विद्यापीठ अभ्यासक्रमात समावेशाचा निषेध Read More »

GuruPurnima : गुरुविना जीवन व्यर्थ व अंधकारमय -ह.भ.प. अशोकानंद महाराज कर्डिले

GuruPurnima : गुरुविना जीवन व्यर्थ व अंधकारमय -ह.भ.प. अशोकानंद महाराज कर्डिले

GuruPurnima : फिनिक्सच्या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरास ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद GuruPurnima : अहमदनगर (प्रतिनिधी)- जीवनामध्ये प्रथम गुरु माता-पिता असतात. त्यानंतर शिक्षक व सर्वात शेवटी प्रत्येक व्यक्ती ज्याने कळत न कळत जगण्याचा अर्थ शिकवलेला असतो. गुरुविना जीवन व्यर्थ व अंधकारमय आहे. एका गुरुप्रमाणे फिनिक्स फाऊंडेशन दृष्टीहीनांना जीवनात प्रकाश निर्माण करण्याचे कार्य करीत …

GuruPurnima : गुरुविना जीवन व्यर्थ व अंधकारमय -ह.भ.प. अशोकानंद महाराज कर्डिले Read More »

Markandeya Patsanstha : Be the best officer and the best man - Prof. Vitthal Bulbule

Markandeya Patsanstha : उत्तम अधिकारी व सर्वोत्तम माणूस व्हा – प्रा.विठ्ठल बुलबुले

Markandeya Patsanstha : अहमदनगर (दि १७ जुलै २०२२) प्रतिनिधी- आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे, यात आजच्या विद्यार्थ्यांनी अपडेट राहिले तरच भविष्य उज्वल असणार, त्यासाठी जिद्द, मेहनत व चिकाटी अंगी असणे महत्वाचे  आहे. स्पर्धा परीक्षेतून तुम्ही उत्तम अधिकारी व्हाच मात्र सर्वोत्तम माणूस व्हा असे प्रतिपादन यशदा पुणेचे माजी कार्यक्रम अधिकारी व  मानद व्याख्याते प्रा. विठ्ठल …

Markandeya Patsanstha : उत्तम अधिकारी व सर्वोत्तम माणूस व्हा – प्रा.विठ्ठल बुलबुले Read More »

AMC: Stop the plight of the citizens by putting pimples on the roads or stay in the hall

AMC : रस्त्यांवर मुरुम टाकून नागरीकांचे हाल थांबवावे अन्यथा दालनात ठिय्या आंदोलन

अहमदनगर (दि १७ जुलै २०२२) प्रतिनिधी- नगर-औरंगाबाद रोडवरील सूर्यनगरमधील रस्ते अत्यंत खराब झालेल्या अवस्थेत असतांनाच गेले सात दिवसांपासून पडणार्‍या भीज पावसाने वाहने तर सोडा पण पायी चालणे कठिण झाले आहे. नवीन रस्ते करण्याबाबत मनपाकडे पाठपुरावा केला तरीही दखल घेतली नाही. नागरिकांचे अतोनात हाल होत असून सध्याच्या परिस्थितीत मनपाने तातडीने मुरुम टाकून दिलासा द्यावा. दोन दिवसात …

AMC : रस्त्यांवर मुरुम टाकून नागरीकांचे हाल थांबवावे अन्यथा दालनात ठिय्या आंदोलन Read More »

Honoring Students : जिल्हा उर्दू हेडमास्टर्स असो. तर्फे जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

Honoring Students : विद्यार्थ्यांच्या यशाचा शिक्षकांना अभिमान – डॉ.प्रा.सलाम सर अहमदनगर (दि १७ जुलै २०२२) प्रतिनिधी- अहमदनगर जिल्हा उर्दू हायस्कूल हेडमास्टर्स असोसिएशनच्या वतीने दहावी व बारावीच्या परीक्षेत सुयश मिळविलेल्या जिल्ह्यातील 19 माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयांतील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अल्फलाह एज्युकेशन अ‍ॅण्ड वेलफेअर सोसायटीचे प्रमुख कार्यवाह डॉ. प्रा.अलहाज …

Honoring Students : जिल्हा उर्दू हेडमास्टर्स असो. तर्फे जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान Read More »

GuruPurnima : वसंत टेकडी साई- मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता

GuruPurnima : वसंत टेकडी साई- मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता

GuruPurnima : वाढत्या स्पर्धेमुळे, ताणतणावांमुळे पावलोपावली मार्गदर्शनाची अधिक गरज निर्माण झाली आहे – हभप ढोक महाराज GuruPurnima : अहमदनगर (दि १७ जुलै २०२२) प्रतिनिधी – आजच्या काळात आपल्या संस्कृतीचे झपाट्याने अवमुल्यन होत आहे. वाढत्या स्पर्धेमुळे, ताणतणावामुळे पावलोपावली मार्गदर्शनाची अधिक गरज निर्माण झाली आहे. या तणावपूर्ण टप्प्यावर सशक्त, सकारात्मक असे गुरु-शिष्याचे नाते हितकारक राहिल, असे मार्मिक विचार …

GuruPurnima : वसंत टेकडी साई- मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता Read More »