Wednesday, September 27, 2023
HomeAHMEDNAGARParner News: भोसले व माने दोघेही सर्वसामान्य जनतेचे अधिकारी : आमदार...

Parner News: भोसले व माने दोघेही सर्वसामान्य जनतेचे अधिकारी : आमदार नीलेश लंके

Parner News: प्रांताधिकारी सुधाकर भोसले व गटविकास अधिकारी किशोर माने यांनी पडद्यामागून सेवा केली

Parner News: पारनेर : कोरोना महामारी असो वा इतर आपत्कालीन स्थिती किंवा सर्वसामान्य जनतेची कामे यासाठी प्रांत अधिकारी सुधाकर भोसले व गटविकास अधिकारी किशोर माने यांनी मोठ्या प्रमाणावर सोडविली आहे. त्यामुळे हे दोघेही सर्वसामान्य जनतेचे अधिकारी असल्याचे गौरवद्गार राष्ट्रवादी काँग्रेस आमदार नीलेश लंके यांनी काढले आहेत.

तर दुसरीकडे कोरोनाचे जागतिक भयंकर संकट आल्यानंतर कर्जुले हर्या व भाळवणी येथे आपण सुरू केलेल्या शरदचंद्र पवार आरोग्य मंदिरात प्रांताधिकारी सुधाकर भोसले व गटविकास अधिकारी किशोर माने यांनी पडद्यामागून सेवा केली. कधीही प्रसिध्दीचा हव्यास केला नाही. जागतिक पातळीवर गेलेल्या या कोव्हिड सेंटरचे खर्‍या अर्थाने सुधाकर भोसले व किशोर माने हे मानकरी असल्याचे गौरोद्गार आमदार नीलेश लंके यांनी काढले.

पारनेरचे गटविकास अधिकारी किशोर माने यांची बदली झाल्यामुळे पारनेर पंचायत समितीमध्ये त्यांचा -हदय निरोप समारंभ पार पडला. यावेळी आ. नीलेश लंके यांनी त्यांचा सपत्नीक सत्कार करून त्यांच्या कामाचे तोंड भरून कौतुक केले. ते म्हणाले, प्रांताधिकारी सुधाकर भोसले तसेच गटविकास अधिकारी किशोर माने हे पारनेर तालुयाला मिळालेले हिरे होते. त्यांनी कोरोना काळात स्वतःला झोकून देत काम केले. त्यांच्या प्रशासकिय कामकाजातही त्यांनी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेऊन काम केले. त्यामुळे या दोन्ही अधिकार्‍यांच्या टेबलवर कोणतेही काम प्रलंबित राहिल्याची तक्रार आली नाही.

भाळवणी आरोग्य केंद्रामध्ये ऑसीजन पुरवठयाची जबाबदारी किशोर माने यांनी समर्थपणे सांभाळली. राज्यात ऑसिजनचा तुटवडा निर्माण झाला तरही माने यांनी योग्य नियोजन करून भाळवणीच्या केंद्रासाठी ऑसिजन कमी पडू दिला नाही. स्वतःच्या घरचे काम जसे जातीने लक्ष घालून केले जाते तसेच काम माने यांनी करून आपली जबाबदारी समर्थपणे सांभाळली.

सख्ख्या भावाप्रमाणे उभे राहिले

कोरोना महामारीचा मुकाबला करणे अतिशय अवघड काम होते. मात्र सख्या भावाप्रमाणे प्रांताधिकारी सुधाकर भोसले व गटविकास अधिकारी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. प्रशासकिय कामकाजातही त्यांचे अनमोल सहकार्य मिळाले. कोणत्याही कामासाठी त्यांना एकच फोन पुरेसा ठरायचा. जनतेची प्रामणिक सेवा करणारे, जनतेची काळजी असणारे दोन्ही अधिकारी बदलून गेल्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दोघेही अधिकारी ज्या ठिकाणी जातील तिथे ते प्रामाणिक व पारदर्शकच कारभार करतील याची मला शंभर टक्के खात्री आहे.

-आ. नीलेश लंके

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments