
Post Office Ahmednagar: अहमदनगर (प्रतिनिधी): स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत दि.13 ते 15 ऑगस्ट दरम्यान प्रत्येक
शासकीय, निमशासकीय कार्यालय, बँका आदिंसह प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकविण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सर्वांसाठी प्रत्येक पोस्ट कार्यालयात ध्वज उपलब्ध करण्यात आले आहेत. सुट्टीच्या दिवशीही हे ध्वज विक्री पोस्ट कार्यालयातून सुरु होती.
नगरच्या आनंदीबाजार पोस्ट ऑफिसमध्येही दि.13 रोजी नागरिकांनी ध्वज खरेदी येत होते. याप्रसंगी पोस्ट कार्यालयाचे विपनण अधिकारी दिपक नागपुरे, सब पोस्ट मास्तर विजय चाबुकस्वार, अमोल साबळे, पोस्टमन संतोष थोरात यांनी नागरिकांना सुट्टीच्या दिवशीही तिरंगा ध्वज उपलब्ध करुन दिले.