Wednesday, September 27, 2023
HomePolicePune Crime News: मोबाईल चोरणाऱ्या टोळीला बंडगार्डन पोलिसांनी बेड्या ठोकल्या

Pune Crime News: मोबाईल चोरणाऱ्या टोळीला बंडगार्डन पोलिसांनी बेड्या ठोकल्या

Pune Crime News: मोबाईल चोरणाऱ्या टोळीला बंडगार्डन पोलिसांनी बेड्या ठोकल्या News File Photo

पुणे : Pune Crime News | गर्दीचा फायदा घेऊन बसमध्ये चढत असताना प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला बंडगार्डन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या चार जणांकडून 2 लाखांचे 12 मोबाईल जप्त केले आहेत. ही कारवाई (Pune Crime News) मालधक्का रोडवर करण्यात आली आहे.

सतीश व्यंकटेश माधगोलू (वय-22 रा. उपलपेटा, जि. हैदराबाद, तेलंगणा-, जगदीश भास्करराव आवला (वय-22 रा. तुरकनाडी वलसा, ता. जीएम वलसा, जि. पारथीपुरम, आंध्रप्रदेश-, विक्रम शिवनाथ दास (वय-22 रा. उपलपेटा, जि. हैदराबाद, तेलंगणा), गणेश कृष्णा गोड (वय-22 रा. बी.के. बहरा, जि. महासमुंद, छत्तीसगड-) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत बंडगार्डन पोलीस ठाण्यात 5 ऑगस्ट रोजी आयपीसी 379,34 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

फिर्यादी व त्यांचे चुलत भाऊ घरी जाण्यासाठी अलंकार चौकातील पीएमटी बसस्टॉपवरुन केशवनगर येथे जाणाऱ्या बसमध्ये चढत होते. त्यावेळी चार अनोळखी व्यक्तींनी त्यांच्या खिशातून दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल चोरून नेल्याची फिर्याद बंडगार्डन पोलीस ठाण्यात दिली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस अंमलदार मनोज भोकरे , शिवाजी सरक यांना माहिती मिळाली की, पुणे स्टँडसमोर मालधक्काकडे जाणाऱ्या रोडवरील अंडाभुर्जीच्या हातगाडीजवळ चार जण थांबले असून ते मोबाईल विकत घेण्याबाबत विचारणा करत असून मोबाईल चोरीचे असल्याचा संशय आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून चार जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 12 मोबाईल ताब्यात
घेऊन मोबाईलबाबत चौकशी केली असता पुणे शहातील विविध भागातून चोरल्याची कबुली दिली.
आरोपींनी बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन तर येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून
एक मोबाईल चोरल्याचे तपासात उघड झाले आहे. आरोपींकडून 2 लाख 10 हजार रुपये किंमतीचे 12 मोबाईल जप्त केले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार, पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक, अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील,
पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील , सहायक पोलीस आयुक्त लष्कर विभाग आर.एन. राजे
, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील , पोलीस निरीक्षक गुन्हे अश्विनी सातपुते
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गावडे ,
मोहन काळे अनिल कुसाळकर, संजय वणवे, मनोज भोकरे, शिवाजी सरक, तुळशीराम घडे यांच्या पथकाने केली.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments