Wednesday, September 27, 2023
HomePolicePune Ganeshotsav 2023 | पुण्यातील उत्सवी गर्दीवर 1800 सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवली...

Pune Ganeshotsav 2023 | पुण्यातील उत्सवी गर्दीवर 1800 सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार

Pune Ganeshotsav 2023 | पुण्यातील उत्सवी गर्दीवर 1800 सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार

Pune Ganeshotsav 2023 | पुणे : पुणे शहरामध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. पुण्यातील गणेशोत्सव पाहण्यासाठी देशातील तसेच विदेशातील नागरिक पुण्यात येत असतात. पुण्यात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन पुणे पोलिसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना मंडपाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Camera) बसविण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुण्यातील उत्सवी गर्दीवर 1800 सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवली जाणार आहे.

गणेश उत्सव काळात कोणताही अनुचित घटना, दागिने, मोबाइल चोरीच्या घटना रोखणे तसेच संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar), सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक (IPS Sandeep Karnik) यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. उत्सव काळात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

स्थानिक पोलीस ठाण्यातील पोलिस अधिकारी व कर्मचारी, गुन्हे शाखेची सर्व पथके, महिलांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेली दामिनी पथके, साध्या वेशातील पोलीस कर्मचाऱ्यांचे पथक शहरातील विविध भागात गस्त घालणार आहेत. शहरातील उत्सवी गर्दीवर पुणे पोलिसांनी बसवलेले 1300 आणि स्मार्ट सिटी योजना, महापालिकेच्या 500 अशा एकूण 1800 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर शहरावर असणार आहे. (Pune Ganeshotsav 2023)

शहरात अडीच हजाराहून अधिक मंडळे

पुणे शहरामध्ये घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. शहरामध्ये अडीच हजाराहून अधीक नोंदणीकृत सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. पोलिसांनी शहरातील सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकारी यांच्यासोबत संवाद साधला आहे. गणेश भक्तांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी गणेश मंडळांनी उत्सवाच्या काळात मंडपामध्ये तसेच परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.

Pune Ganeshotsav 2023 | नियंत्रण कक्षातून गर्दीवर नजर

शिवाजी रस्ता परिसरातील बुधवार चौक ते मंडईतील गोटीराम भैय्या चौक दरम्यान उत्सवाच्या कलावधीत गणेश भक्तांची मोठी गर्दी असते. मंडीई, हुतात्मा बाबू गेनू चौक परिसरात भाविकांची मोठी गर्दी होत असते. शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता,

लक्ष्मी रस्ता, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रस्ता, डेक्कन जिमखाना या भागात होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून गर्दीवर नियंत्रण ठेवता येणार आहे. तसेच बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना सूचना देता येतील. सदाशिव पेठ,

नारायण पेठ, शुक्रवार पेठ येथील अंतर्गत भागात असणारे दुकानदार, व्यावसायिक यांनी देखील सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. शहरात लावण्यात आलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पोलीस आयुक्तालय, उपायुक्त कार्यालयाशी जोडणी केली आहे. पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षातून गर्दीवर बारीक लक्ष ठेवले जाणार आहे.

Pune Ganeshotsav 2023 | पोलिसांचा मोठा बंदोबस्त

देशभरात घातपाती करावाई करण्याच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना पुण्यातून अटक केली आहे. संभाव्य दहशतवादी हल्ला, घातपाती कारवायांचा विचार करुन पुणे पोलिसांकडून गणेशोत्सव काळात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला जाणार आहे.

भाविकांच्या सुरक्षेला प्राधान्य – पोलीस आयुक्त

गणेशोत्सवात हजारो भाविक पुणे शहरात येतात. भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून,
उत्सवातील गर्दीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. सार्वजनिक मंडळे, स्थानिक व्यापारी,
व्यावसायिक यांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत, असे आवाहन पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments