
Pune News: पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ अद्याप सुरूच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कोयता गँगकडून शहरात लुटमारी, गाड्या फोडणे, नागरिकांना धमकावण्याचे प्रकार सुरूच आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून कोयता गँगने पुण्यात धुडगूस घातला आहे. तरी पोलिसांना कोयता गँगला आवर घालता आलेला नाही. या गँगच्या वाढत्या गुन्ह्याकडे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लक्ष घालावे, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे.
पुण्यात कोयता गँगच्या विरोधात पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू आहे. पोलिसांनी आतापर्यंत काही कोयता गँगच्या सदस्यांनाही गजाआड केले आहेत. तरी दुसरीकडे पुण्यात कोयता गँगचा धुडगूस सुरूच असल्याचे चित्र पुण्यात पाहायला मिळत आहे.
कोयता गँगची नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे . या गँगवर आळा घालण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. तर पुण्यातील कोयता गँगच्या घटनेची गंभीर दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याशी चर्चा केली. याबरोबरच शहरातील संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गृहमंत्र्यानी आदेश द्यावेत, अशी मागणी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहरात कोयता गँगची दहशत वाढली असून गाड्या फोडणे, नागरीकांना धमकावून त्यांना मारहाण करणे असे प्रकार सुरू आहेत. आजही वारजे परिसरात या गँगने धुमाकूळ घालत गाड्यांच्या काचा फोडल्या. या घटनेबाबत सुळे यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी सविस्तर चर्चा केली, असे सुळे यांनी सांगिलते.