Sunday, September 24, 2023
HomeINDIARahul Gandhi: राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाने दिला मोठा दिलासा ; 2...

Rahul Gandhi: राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाने दिला मोठा दिलासा ; 2 वर्षाच्या शिक्षेला आज स्थिगिती

Rahul Gandhi: राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा ; 2 वर्षाच्या शिक्षेला आज स्थिगिती दिली

Rahul Gandhi: नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. मोदी आडनाव प्रकरणात सुनावण्यात आलेल्या 2 वर्षाच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाने आज स्थिगिती दिली आहे.

मोदी आडनावा प्रकरणी मानहानीच्या खटल्यात राहुल गांधींना मार्च २०२३ मध्ये सुरत न्यायालयाने दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.

याविरोधात राहुल गांधी यांनी गुजरात हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र, गुजरात हायकोर्टाने ७ जुलै रोजी यावर सुनावणी घेत शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला होता. यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टात न्यायालयात धाव घेतली होती.

दरम्यान, “पूर्णेश मोदी हे मुळात मोदी समाजातील नाहीत. यापुर्वी कोणत्याही प्रकरणात शिक्षा झालेली नाही. त्यामुळे माफी न मागितल्याने अहंकारी म्हणणे चुकीचे आहे. ‘मोदी आडनाव’ टिप्पणीबद्दल माफी मागण्याची गरज नाही. कारण मी दोषी नाहीच. जर त्यांना माफी मागून विषय संपवायचा असता तर त्यांनी ते खूप आधीच केले असते, असे राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या जबाबात म्हटलं होतं.

Rahul Gandhi: राहुल गांधी यांनी संपूर्ण समाजाचा अपमान केलेला नाही

आज सुप्रीम कोर्टात यावर सुनावणी झाली. राहुल गांधी यांच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी, तर पूर्णश मोदी यांच्यावतीने महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. दोन्ही वकिलांना युक्तीवादासाठी १५-१५ मिनिटाचा अवधी मिळाला. राहुल गांधी यांनी संपूर्ण समाजाचा अपमान केलेला नाही, अशा परिस्थितीत केवळ राहुल यांनाच अशी शिक्षा झाली आहे, असा युक्तिवाद राहुल गांधी यांच्या वतीने करण्यात आला आहे.

खासदारकी रद्द व्हावी म्हणून ही शिक्षा सुनावण्यात आली का?

कोर्टाने दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकल्यानंतर सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थिगिती दिली. “आडनावाच्या बदनामीच्या खटल्यावर शिक्षा सुनावत असताना राहुल गांधींना गुजरात न्यायालयाने सर्वाधिक असलेली दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यांची खासदारकी रद्द व्हावी म्हणून ही शिक्षा सुनावण्यात आली का? असा सवाल कोर्टाने उपस्थित केला.

ज्यांनी मला साथ दिली प्रेम दिले त्यांचे मनापासून धन्यवाद ! राहुल गांधी

सुप्रीम कोर्टच्या निर्णयाचं मी स्वागत करतो : खर्गे

वाजत गाजत काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

महाराष्ट्र काँग्रेसने केले ट्विट

माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी ट्विट केले

आमदार रोहित पवार यांनी ट्विट केले

काँग्रेसच्या अधिकृत ट्विटवर आले हे ट्विट

खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments