
Rakhi: देशप्रेम आणि सामाजिक दायित्वाचे जाणिव विद्यार्थ्यांना झाली पाहिजे- श्रीपाद कुलकर्णी
Rakhi: अहमदनगर (प्रतिनिधी): भारतीय संस्कृतीत सण-उत्सवांना
मोठे महत्व आहे, आपले सण-उत्सव हे पर्यावरण पुर्वक असे आहेत,
त्याचा आपले आरोग्यावरही सकारात्मक परिणाम होत असतात.
रक्षबंधन हा भाऊ-बहिणीचे नाते दृढ करणारा सण. विद्यार्थ्यांना
बालपणापासून याची माहिती व महत्व कळावे, यासाठी असे उपक्रम शाळेत नेहमीच घेतले जातात.
देशप्रेम आणि सामाजिक दायित्वाचे जाणिव विद्यार्थ्यांना व्हावी,
यासाठी अनामप्रेम संस्थेतील अंध विद्यार्थ्यांना राख्या बांधून
एक आगळा-वेगळा कार्यक्रम राबविला आहे.
आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न
समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी काम करणार्या अनामप्रेम संस्थेतील मुलांनाही आपलेही कुटुंब आहे, आपल्याही बहिणी आहेत ही भावना यानिमित्त रुजविण्याचा प्रयत्न करुन त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेचे चेअरमन श्रीपाद कुलकर्णी यांनी केले.
राखी पौर्णिमेनिमित्त सांगळे गल्ली येथील श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी अनाम प्रेम संस्थेतील अंध मुलांना राख्या बांधल्या. याप्रसंगी शालेय समिती चेअरमन श्रीपाद कुलकर्णी, मुख्याध्यापक अजय महाजन, अनाम प्रेमचे अजित कुलकर्णी, आनंद माळवदे, सोनाली माकरे, सुनिता पांडव, सौ.धोत्रे आदि उपस्थित होते.
अनाथ दिव्यांगांना आधार देण्याचे काम अनामप्रेम संस्था करत आहे
आनंद माळवदे म्हणाले, समाजातील दुर्लक्षित, अनाथ दिव्यांगांना आधार देण्याचे काम अनामप्रेम संस्था करत आहे. या मुलां-मुलींना आपण एका मोठ्या कुटूंबात असल्याची विश्वास देत त्यांची उन्नत्ती साधली जात आहे. या सामाजिक कार्यात अनेकांचा हातभार लागत आहे. आज राखी पौर्णिमेनिमित्त श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेतील विद्यार्थ्यांनींनी या अंध भावांना राख्या बांधून हा परिवार अधिक व्यापक केला असल्याचे सांगितले.
प्रास्तविकात मुख्याध्यापक अजय महाजन म्हणाले, विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, अभ्यासाबरोबरच सण-उत्सव, राष्ट्रपुरुषांचे कार्य समजावे यासाठी विविध उपक्रमातून धडे दिले जात आहे. राखी पौर्णिमेनिमित्त अनामप्रेम संस्थेतील मुलांना बहिणीची माया देण्याचा प्रयत्न करुन विद्यार्थ्यामध्येही सामाजिक भावना जागृत करण्याचा प्रयत्न यानिमित्त केला असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली माकरे यांनी केले तर आभार सुनिता पांडव यांनी मानले. या उपक्रमाचे पालकांसह नागरिकांनी कौतुक केले.