Darshak News
World Wide News
Saiban: Space travel is enjoyed in Saiban

Saiban: अंतराळ सफरीचा आनंद मिळतो साईबनमध्ये 

Saiban: अंतराळ सफरीचा आनंद मिळतो साईबनमध्ये 

          Saiban:   अहमदनगर (प्रतिनिधी) -नगर शहरापासून जवळ असलेल्या एम.आय.डी.सी येथील साईबनमध्ये अंतराळ सफर हा अनोखा प्रोजेक्ट आहे.साईबन मध्ये एका मोठ्या शेडमध्ये प्रवेश केला कि समोर सर्व अंतराळ दिसते व आपण कोठे आहोत याचे भान विसरून येणारा प्रत्येक जण त्यामध्ये पाहण्यात व माहिती वाचण्यात रमून जातो या अंतराळ सफारीचे पूर्णतः नूतनीकरण करण्यात आले असून ते पाहण्यास पर्यटक गर्दी करत आहेत 

Pre Wedding Saiban: प्री वेडिंग फोटोग्राफीसाठी साईबनला पसंती

             भव्य अशा हॉलमध्ये अंतराळ खगोलशाश्राची सखोल माहिती ठेवण्यात आली असून या ठिकाणी भेट दिल्यावर अंतराळ सफरीचा आनंद मिळतो आहे.याठिकाणी गेल्यावर प्रथम मांडण्यात आलेल्या चित्ररूप प्रदर्शनात विश्वाचा जनक झाल्यापासून खगोल शाश्राचा कसा विकास होत गेला,सुर्यमालेतील सर्व ग्रहांविषयी माहिती,आकाशगंगेतील पृथ्वीचे स्थान तसेच विविध आकाशगंगा,तारे याविषयी सखोल माहिती मांडण्यात आली असून चंद्रग्रहण कसे होते, तारा कसा तुटतो,उल्का वर्षाव तार्याचा जन्म व नष्ट होणे याविषयी माहिती देण्यात येते. 

             खगोल शाश्रात योगदान दिलेल्या आर्यभट्ट,भास्कराचार्य,पासून डॉ. जयंत नारळीकर,डॉ,अब्दुल कलाम,या शास्त्रन्यानाचीमाहिती, अंतरात गेलेला पहिला सजीव,उपग्रह मानव भारतीय यांची सचित्र माहिती लावण्यात आलेली आहे,भारतीय अंतराळ संस्था(इस्रो)ने आजपर्यंत अवकाशात सोडलेल्या सर्व उपग्रहान्विषयी तसेच विविध रॉकेट यांची सचित्र माहिती तसेच पीएसएल-व्ही, जी एस एल-व्ही अंतराळवीर यांचे मॉडेल प्रतिकृती ठेवण्यात आलेल्या आहेत. 

Sai Ban: दीपावली सुट्टीत साईबनमध्ये पर्यटकांची वाढली गर्दी 

             अंतराळवीर प्रतिकृती ज्यामध्ये आपला चेहरा ठेऊन अंतराळवीरसारखा चेहरा फोटो काढता येतो. बाजूला सर्व चंद्रावरील वातावरना सारखी निर्मिती करण्यात आलेली असून एक प्रकारे आपण चंद्रभूमीवरच आहोत असे वाटते.हे येथे येणाऱ्या सर्वांचेच,पर्यटकाचे आकर्षण आहे. छतावर फाईबरपासून बनवलेल्या सौरमालेतील प्रत्येक ग्रहाच्या प्रतिकृती तयार करून लटकविण्यात आल्या आहेत.  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: