Monday, October 2, 2023
HomeAHMEDNAGARSamarth School: शाळेतून मिळालेल्या संस्कारातून दातृत्वाची भावना: लक्ष्मीकांत

Samarth School: शाळेतून मिळालेल्या संस्कारातून दातृत्वाची भावना: लक्ष्मीकांत

Samarth School: शाळेतून मिळालेल्या संस्कारातून दातृत्वाची भावना: लक्ष्मीकांत

Samarth School: समर्थ विद्या मंदिरच्या माजी विद्यार्थ्यांच्यावतीने शाळेला सिलिंग फॅन व अ‍ॅक्वागार्ड भेट

Samarth School: अहमदनगर (प्रतिनिधी) : विद्यार्थी कितीही मोठा झाला, आपल्या नोकरी, व्यवसायात व्यस्त असला तरी आपल्या शाळेला कधीही विसरत नाही. शाळेतील दिवस हे सर्वांत आनंदी दिवस असतात. शाळेतून मिळालेले संस्कार आणि शिक्षणामुळेच तो जीवनात यशस्वी होत असतो. त्याला नेहमीच आपल्या शाळेबद्दल अभिमान असतो. शाळेची प्रगती व्हावी येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अडचणी येवू नये यासाठी तत्पर असतो. शाळेशी जोडलेली नाळ छोट्याशा मदतीतून कायम ठेवण्यासाठी आज हा उपक्रम राबविला आहे.

शाळेतून मिळालेल्या संस्कारातून दातृत्वाची भावना कायम असल्याचे प्रतिपादन लक्ष्मीकांत ढोरे यांनी केले. समर्थ विद्या मंदिर, सांगळे गल्ली मधील 1983 च्या माजी विद्यार्थ्यांच्यावतीने शाळेला सिलिंग फॅन व अ‍ॅक्वागार्ड देण्यात आले. याप्रसंगी लक्ष्मीकांत ढोरे, श्रीपाद कुलकर्णी, सुरेश क्षीरसागर, स्वप्नील कुलकर्णी, मुख्याध्यापक अजय महाजन, ज्येष् शिक्षक सतिश मेढे आदि उपस्थित होते. यावेळी श्रीपाद कुलकर्णी म्हणाले, श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळाच्या माध्यमातून सर्वसामान्य घरातील मुलांना शिक्षण देण्यात येत आहे.

या शाळेतून अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत आपले भविष्य उज्वल केले आहे. विद्यार्थीही शाळेला न विसरता शाळेच्या उपक्रमात योगदान देत असतात. आज मी याच शाळेत शिकलो आणि याच शाळेचा संचालक म्हणून काम करत असल्याचा अभिमान आहे. शाळेसाठी आवश्यक गरजा पूर्ण करणे हे आम्हा माजी विद्यार्थ्यांचे कर्तव्य समजून फॅन व अ‍ॅक्वागार्डची मदत केली असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी मुख्याध्यापक अजय महाजन म्हणाले, शाळेचे आणि विद्यार्थ्यांचे नाते हे शेवटपर्यंत असते.

आपल्या शाळेविषयी आपुलकी ठेवून मदतीचा हात देण्याचा उपक्रम कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढविण्यासाठी शाळा प्रयत्न करत आहे, त्यात अशा उपक्रमातून बळ मिळणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लिना बंगाळ यांनी केले तर आभार शंकर निंबाळकर यांनी मानले. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments