Monday, October 2, 2023
HomeAHMEDNAGARSanjay Gandhi Yojna: प्रयागा लोंढे यांची संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्यपदी निवड

Sanjay Gandhi Yojna: प्रयागा लोंढे यांची संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्यपदी निवड

Sanjay Gandhi Yojna: प्रयागा लोंढे यांची संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्यपदी निवड

Sanjay Gandhi Yojna: अहमदनगर (प्रतिनिधी): शेंडी गावाच्या सरपंच प्रयागा लोंढे यांची नगर तालुका संजय गांधी निराधार योजना समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे सरपंच पदाच्या माध्यमातून विधवा परिकता,घटस्फोटीत, एकल अशा महिलांसाठी कायम मदतीचा हात देत आहेत,संजय गांधी निराधार योजनेचे माहिती सांगणे

अशा पद्धतीचे कार्यक्रम राबवत असत,विधवा महिलांचे हळदीकुंकू कार्यक्रम घेत असत तसेच अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी राबविले आहेत तसेच संजय गांधी निराधार योजना,श्रावणबाळ योजना आदि योजनांचा लाभ संबंधितांपर्यंत पोहचविण्यासाठी

त्या अग्रेसर असतात त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांची या पदावर निवड झाली आहे.पालकमंत्री राधाकृष्ण विखे,मा मंत्री शिवाजी कर्डीले,खा सुजय विखे,युवा नेते अक्षय कर्डिले आदींनी त्यांचे निवडी बद्दल अभिनंदन केले आहे

लोंढे म्हणाल्या मिळालेल्या पदाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करु,ग्रामीण भागातील लाभार्थ्यांनी समिती सदस्यांशी संपर्क साधावा व पेन्शनचा लाभ घ्यावा तसेच जास्तीत जास्त गोरगरीब,

सर्वसामान्य निराधार,विधवा यांच्याशी संपर्क करून पेन्शन योजना लाभ तळागाळा पर्यंत पोहचवण्यासाठी,आपल्या पदाचा वापर करून मिळालेल्या संधीचे सोन करणार आहे असे त्या म्हणाल्या त्यांच्या निवडी बद्दल अनेकांनी अभिनंदन केले आहे

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments