Monday, September 25, 2023
HomeAHMEDNAGARSanjay Raut: महाराष्ट्र भवनातून पुतळे हटवल्या नंतर नामांतराची भूमिका ; गोपीनाथ मुंडेंची...

Sanjay Raut: महाराष्ट्र भवनातून पुतळे हटवल्या नंतर नामांतराची भूमिका ; गोपीनाथ मुंडेंची कन्या पंकजाचा पराभव कसा झाला ? : खा संजय राऊत

Sanjay Raut: महाराष्ट्रातलं शिंदे फडणवीस सरकार स्मशानात पोहचलं आहे त्यांनी धोरण लकव्याबाबत चर्चा करु नये असं म्हणत
संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना उत्तर दिलं आहे. अहमद नगरचं अहिल्या नगर असं नामांतर होणार असेल तर
आम्ही त्या निर्णयाचं स्वागत करतो. पण महाराष्ट्र भवनातून पुतळे हटवल्यानंतर ही भूमिका सरकारने घेतली
आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

शिंदे फडणवीस सरकार स्मशानात पोहचलं आहे

“महाराष्ट्रात सध्या सरकार आहे का? आमच्या सरकारला निर्णय लकवा झाला होता,
शिंदे फडणवीस सरकार स्मशानात पोहचलंय. डोळे बंद आहेत, कान बंद आहेत सगळं बंद आहेत.
त्यांनी लकव्याच्या गोष्टी करु नयेत.” असं म्हणत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलं आहे.

पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आहेत. त्यांचा पराभव का आणि कसा झाला ?

“गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, भाऊसाहेब फुंडकर, महादेवराव शिवणकर अशा बहुजन समाजातल्या अनेक
प्रमुख नेत्यांनी महाराष्ट्रात भाजपा शून्यातून उभा केला. शिवसेनेशी युती करून हा पक्ष सत्ताधारी केला.
त्या मुंडे परिवाराचं राजकारणात अस्तित्व राहू नये, यासाठी दिल्लीत आणि महाराष्ट्रात मोठ्या हालचाली सुरू आहेत
हे सगळ्यांना माहिती आहे. पंकजा मुंडे गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आहेत. त्यांचा पराभव का आणि कसा
झाला यावर आम्ही वेगळं बोलण्याची गरज नाही.कारण तो त्यांचा पक्षांतर्गत मुद्दा आहे”, असं संजय राऊतांनी यावेळी नमूद केलं.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments