
Satkar | अहमदनगर (प्रतिनिधी): बागडपट्टी येथील हिंद सेवा मंडळाच्या प्राथमिक शाळेच्या उपशिक्षिका विद्या पोतदार यांना महानगरपालिकेचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देवून त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
पेमराज सारडा महाविद्यालयाच्या वतीने नुकताच आदर्श प्राचार्य पुरस्काराचे वितरण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी यांच्या हस्ते झाले. या समारंभात विद्या पोतदार यांचा कुलगुरूंच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी हिंद सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रा. शिरीष मोडक, मानद सचिव संजय जोशी, कार्याध्यक्ष अॅड.अनंत फडणीस, प्राथमिक शाळेचे चेअरमन मधुसूदन सारडा, सारडा कॉलेजचे चेअरमन सुमतिलाल कोठारी, ज्येष्ठ मार्गदर्शक अजित बोरा व ब्रिजलाल सारडा, जगदीश झालानी, अनंत देसाई, प्रा.मकरंद खेर, सुजित बेडेकर, रणजीत श्रीगोड, प्रा.ज्योती कुलकर्णी, प्राचार्य डॉ,माहेश्वरी गावित, शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल उरमुडे आदींसह मान्यवर उपस्थित होते.
हिंद सेवा मंडळाच्या प्राथमिक शाळेच्या उपशिक्षिका विद्या पोतदार या गेल्या 28 वर्षांपासून शैक्षणीक क्षेत्रत योगदान देत आहेत. गुणात्मक व उपक्रमशील शिक्षणावर भर देत त्यांनी हजारो सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी घडवले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी शाळेतील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीकक्षेत चमकत आहेत.
चालू वर्षी प्राथमिक शाळेतील 20 विद्यार्थी एमएससीआयटी परिक्षेसाठी त्यांनी प्रविष्ठ केले आहेत. विद्या पोतदार यांच्या गुणात्मक व उपक्रमशील ज्ञानदानाची दखल महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाने घेऊन त्यांना यावर्षीचा आदर्श शिक्षिका पुरस्कार घोषित केला आहे, अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल उरमुडे यांनी दिली.